कोल्हापूर

थेट पाईप वीजेचा भुयारी मार्ग

CD

फोटो
...
प्रलंबित कामांना मे अखेरचा मुहूर्त नाहीच

थेट पाईपलाईन योजनाः महापालिकेत आढावा बैठक

कोल्हापूर, ता. ८ ः थेट पाईपलाईनच्या प्रलंबित कामांची स्थिती पाहिल्यास मे अखेर ती पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. त्यानंतर धरणक्षेत्रात पावसाला सुरूवात होत असल्याने योजना पूर्ण होण्यास पुढील वर्ष उजाडेल असे दिसते. महापालिकेत आज झालेल्या बैठकीत योजनेतील विविध प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, जास्तीत जास्त यंत्रणा लावून मे अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
थेट पाईपलाईन संदर्भात गेल्या आठवड्यात बैठक घेऊन प्रलंबित कामे मे अखेर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी दिल्या होत्या. त्यावेळी बिद्री कारखान्याजवळील चार किलोमीटर लांबीच्या भुयारी वीज वाहिनीचे काम प्रलंबित आहे, आता दिरंगाई खपवून घेणार नाही, असे आमदार पाटील यांनी सांगून सोमवारी स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आज महापालिकेत बैठक घेतली.
जॅकवेलचे स्लॅब, धरणातील पाईप, वीजवाहिन्या, उपसा पंप बसवण्याबरोबरच कॉपर डॅम काढण्याची कामे प्रलंबित आहेत. त्या कामांच्या स्थितीचा आज डॉ. बलकवडे यांनी महापालिकेत आढावा घेतला. यामधील बिद्री साखर कारखान्याजवळ भुयारी मार्गाने वीज वाहिनी नेण्याचे महत्वाचे काम प्रलंबित आहे. त्याच्या अतिरिक्त खर्चाचा प्रश्न‍ आहे. वाढीव खर्चाचा अंदाज घेत तो स्वनिधीतून करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वीज कनेक्शनच्या कामाला गती येणार आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, महावितरण, युनिटी कन्सल्टंट, ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.
...

नवीन दराप्रमाणे काम केल्यास खर्च वाढणार

भुयारी वीजवाहिनीसाठी एक कोटी १९ लाख मंजूर आहेत. त्यासाठी नगरविकास विभागाकडून मंजुरीही घेतली आहे. जुन्या दराप्रमाणे कामाची अंदाजित रक्कम ठरवली होती. नवीन दराप्रमाणे काम केल्यास त्याचा खर्च वाढणार आहे. हा अतिरिक्त खर्च भागवण्याबाबत चर्चा झाली. जादा खर्च महापालिका स्वनिधीतून करण्याचे ठरवण्यात आले. यामुळे भुयारी वाहिनीच्या प्रलंबित कामाला गती येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT