कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात माहितीपटांतून उलगडले शाहूंचे कार्य

CD

02219

माहितीपटांतून उलगडले राजर्षी शाहूंचे कार्य
कोल्हापूर, ता. ११ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त विद्यापीठाच्या जर्नालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशन विभागातर्फे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय माहितीपट महोत्सव’ झाला. मानव्यशास्त्र सभागृहातील या महोत्सवात शाहू महाराजांच्या योगदानावर प्रकाश टाकणारे १९ माहितीपट नोंदविण्यात आले होते. विजेत्या पाच माहितीपटांचे स्क्रीनिंग झाले. विजेत्यांना प्रथम, द्वितीय, विशेष परीक्षक पुरस्कार, छायाचित्रण, संकलन आणि ध्वनी अशा स्वरूपाची पारितोषिके, विद्यापीठाचे सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.
चेतन सूर्यवंशी यांच्या ‘कोल्हापूर ते मिरज रेल्वे’ या माहितीपटास प्रथम, समृद्धी पाटील यांच्या ‘साठमारी’ला द्वितीय, सोनाली हुंबरे यांच्या ‘मोतीबाग तालीम’ला विशेष परीक्षक पुरस्कार व उत्कृष्ट ध्वनी अशी पारितोषिके देण्यात आली. सिमरन ठाणेकर यांच्या ‘लक्ष्मी-विलास पॅलेस’ आणि पल्लवी पाटील यांच्या ‘विचार शाश्वत वसतिगृहांचा’ या माहितीपटांना अनुक्रमे उत्कृष्ट छायाचित्रण, संकलन पारितोषिके मिळाली. प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, की राजर्षी शाहू महाराज हे आदर्श नेतृत्वाचे प्रतीक आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून शाहूंचे योगदानाचा जागर निश्चित घडून आला आहे. चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ. शिवाजी जाधव, सुमेधा साळुंखे, परशराम पवार यांनी परिश्रम घेतले. आयोजक डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. पल्लवी पाटील व जावेद तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले.

‘विद्यार्थ्यांचे कौतुक''
प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, की लोकोत्तर व्यक्तींचे कर्तृत्व महान असते. नि:स्वार्थ भावनेतून समाजहिताचे कार्य अशा व्यक्तींकडून होत असते. असे व्यक्तिमत्त्व म्हणजे शाहू महाराज होत. अशा सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्वांवर माहितीपट निर्मितीचे काम विद्यार्थ्यांनी केल्याबद्दल सर्वांचे कौतुक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT