कोल्हापूर

कृषी महाविद्यालयातर्फे कार्यक्रम

CD

03066
कोल्हापूर : राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय दिपप्रज्वलन करताना उपस्थित मान्यवर.

कुशल युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती
डॉ. बापूसाहेब भाकरे; कृषि महाविद्यालय पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : ‘‘भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे. राष्ट्रप्रेमाने भारलेले कृषि पदवीधरांचे ज्ञानसमृद्ध कुशल हात भारताच्या विकासात योगदान देऊन राष्ट्राला जागतिक महासत्ता बनविण्यास बळ देतील,’’ असा आशावाद महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी व्यक्त केला.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण झाले. या वेळी ते बोलत होते.
डॉ. भाकरे म्हणाले, ‘‘कृषी विषयक शिक्षण घेताना कृषी क्षेत्रात उपजीविकेत विविधता आणणे, दुग्ध विकासाला चालना देणे, पशुपालन आणि मत्स्य उद्योग व्यवसाय, सेंद्रिय, नैसर्गिक शेती आणि कमी पाण्यावरील शेती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांत भरारी घ्यावी.’’
विद्यार्थी परिषदेत अनुजा तुरकनेची कार्याध्यक्ष, तर नंदना पी. एम.ची पारितोषिक वितरण समितीवर, सानिया शेख हिची क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या कार्यवाहपदी निवड झाली. प्रतीक्षा काळे, मानसी गोरडे, बाळू मोहन, आयुष भारद्वाज, हृतिक पटार यांची इतर समित्यांवर कार्यवाह म्हणून निवड झाली. आदर्श विद्यार्थी पुरस्काराचा मानकरी समृद्धी गाढवे ठरला. प्रतिभा पाटील, अनिरुद्ध बर्वे, प्रतीक्षा शेणवी हे फिनोलेक्स शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले. गतवर्षी विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धात पारितोषिके पटकावली. स्वप्नील बडे, जस्मिन मुलाणी, हर्षदा काकडे, राजनंदिनी पाटील यांना पुरस्कार दिले. डॉ. भाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. शैलेंद्र कांबळे, डॉ. अविनाश भोसले, प्रा. रविंद्र बोरसे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
डॉ. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. धैर्य दारवाडकर, क्षितिज काकडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भोसले यांनी आभार मानले. डॉ. शैलेंद्र कांबळे, प्रा. रविकिरण माने, उत्तम गाताडे, प्रा. अभय देशपांडे, आदेश सापळे, रवींद्र बोरसे, डॉ. संग्राम धुमाळ, डॉ. उदयकुमार शिंदे, नागेश यलगुलवार, डॉ. शिवाजीराव पाचपुते, डॉ. विजय नाळे, डॉ. भारत कोलगणे, डॉ. संदीप पाटील, प्रा. आबासाहेब मोहिते, डॉ. मुकुंद गुंड, डॉ. रवींद्र पवार, डॉ. ज्ञानेश्‍वर पतंगे यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT