कोल्हापूर

ज्येष्ठ नागरिकांसाठी

CD

वृद्धांना योजनांचा लाभ
देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कक्ष

‘समाजकल्याण’चे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांची माहिती

कोल्हापूर, ता. १५ : ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हा समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. हे काम समाजकल्याण विभागामार्फत सुरु आहे. या योजनांचा लाभ संबंधित वृद्धांना देण्यासाठी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन केला असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या या ज्येष्ठ नागरिक कक्षाला कोल्हापूर जिल्ह्यातील ‘मुक्तांगण’ या ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य परशुराम नांदवडेकर, राजश्री नांदवडेकर, विद्या रमेश चव्हाण तसेच बाळासाहेब भोगम या ज्येष्ठ नागरिकांनी आज भेट दिली. परशुराम नांदवडेकर (वय ६२), राजश्री नांदवडेकर (वय ६०), विद्या रमेश चव्हाण (वय ६०) या ज्येष्ठ नागरिकांनी माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला. या अनुषंगाने समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला.
‘ज्येष्ठ नागरिक समाजाच्या आदर्शस्थानी असतात. ज्येष्ठांपासून अनुभवाच्या गोष्टी शिकायला मिळतात, तसेच चांगला समाज घडवण्यामध्ये ज्येष्ठांचा विशेष समावेश असतो’, असेही ते म्हणाले. बाळासाहेब भोगम (वय ७६) यांनी १९९२ पासून मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवत अनेक तालुकास्तरीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुर्वण पदक मिळविले आहे. यावेळी विद्या चव्हाण यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करतानाचे आपले थरारक अनुभव सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT