कोल्हापूर

जनता विद्यालयात २० वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग

CD

03368
तुर्केवाडी : जनता विद्यालयातील २००२-०३ च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी.

जनता विद्यालयात २० वर्षांनंतर
भरला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १७ : तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालयात २००२-०३ साली दहावीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आले. वीस वर्षांनंतर त्यांचा वर्ग भरला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मस्ती की पाठशाला, या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून या मेळाव्याचा संकल्प सोडला होता. तो यशस्वीपणे पार पडला. निवृत्त मुख्याध्यापक एस. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फेटे बांधून शाळेच्या स्वागत कमानीपासून पुष्पवृष्टी करत सभामंचावर आणण्यात आले. मुख्याध्यापक पी. एन. यळ्ळूरकर, संस्थेचे सचिव जी. एन. पाटील, अध्यक्ष आर. एन. पाटील, व्ही. आर. गावडे, एस. आर. मुरकुटे, व्ही. के. मानकर, वाय. एस. जोशी, एस. ए. पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी चंदन बांदिवडेकर, रवींद्र पाटील, राजश्री मुरकुटे, यल्लूताई पाटील, विनायक पाटील, नागेश सुतार यांनी मनोगते व्यक्त केली. विविध क्षेत्रांत काम करणारे वर्गमित्र एकत्र आल्यावर एकमेकांची विचारपूस झाली. शाळा व परिसर स्वच्छता केली. संगीत खुर्चीचा खेळ खेळला. यापुढील काळातही एकत्र येण्याचा निर्णय घेऊन मेळाव्याची सांगता झाली. विद्या कदम यांनी स्वागत केले. महेश बसापुरे यांनी प्रास्ताविक केले. विनोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर बजरंग पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT