कोल्हापूर

व्हाईट आर्मी

CD

व्हाईट आर्मीकडून महापालिका
प्रशासकांसमोर कागदपत्रे सादर

उपोषणाचा इशारा; निधी समितीची बैठक बोलवण्याचे आदेश

कोल्हापूर, ता. १८ ः जैन बोर्डिंग कोविड सेंटरमधील रुग्णांना दिलेल्या पोषण आहाराच्या खर्च मागणीबाबत यापूर्वी सादर केलेली कागदपत्रे आज पुन्हा व्हाईट आर्मीने महापालिका प्रशासकांसमोर सादर केली. तसेच ती समितीसमोर दाखवली नसल्याचा निषेध करताना उद्यापासून (ता.१९) बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तातडीने निधी समितीची बैठक बोलवण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले. या प्रकारात अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याने मान्यही करण्यात आले.
व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, प्रशांत शेंडे यांनी बिलाबाबत आज प्रशासक बलकवडे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वर्कऑर्डर, सेल्फ डिक्लेरेशन, सीपीआरचा सीसीसीचा अहवाल, नोडल अधिकाऱ्याचे पत्र यापूर्वी महापालिकेकडे सादर केल्याचे सांगितले. ती कागदपत्रे निधी समितीसमोर दाखवली गेली नसल्याने त्यावेळी खर्च मिळू शकला नाही. याबाबत प्रशासनाचा निषेध करत असल्याचे रोकडे यांनी सांगितले. स्वतःचे पैसे घालून जेवण दिले असल्याचेही सांगितले. याबाबत प्रशासनाने निधी दिला नाही तर शुक्रवारपासून (ता. १९) महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचेही सांगितले. त्यानंतर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी इतर अधिकाऱ्यांना बोलवून कागदपत्रांची व रोकडे यांच्या इशाऱ्याबाबत चर्चा केली. त्यावेळी पूर्वीच्या फाईलमध्ये काही कागदपत्रे नसल्याचे दिसले. त्याबाबतही रोकडे यांनी ही बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या अखत्यारितील असून, माझ्याकडील पत्रांवर महापालिकेचे शिक्के असल्याचे दाखवले. यानंतर प्रशासकांनी पुन्हा निधी समितीची बैठक बोलवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यामध्ये व्हाईट आर्मीने सादर केलेली कागदपत्रे ठेवून निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासनही दिले. या वेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव उपस्थित होते. त्यानंतर उपायुक्त आडसूळ यांनी रोकडे यांना त्या आशयाचे पत्र दिले. तसेच उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT