कोल्हापूर

पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक जखमी

CD

03780
-------
पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक जखमी
गडहिंग्लज जलतरण तलाव; देखभालीकडे डोळेझाक, नागरिकांतून नाराजी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : येथील जलतरण तलावाच्या (स्विमिंग टँक) देखभालीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा फटका पोहायला आलेल्या एका नागरिकाला बसला. अंघोळ करुन बाहेर येताना लोखंडी जिन्यावर पाय ठेवताच त्या नागरिकाच्या दोन्ही तळपायांना लोखंड कापल्याने इजा झाली आहे. पालिकेच्या या दुर्लक्षाबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, नगर अभियंता सुधीर पोतदार यांच्याशी संपर्क साधला असता लोखंडी पायऱ्‍यांचे काम करुन घेणार असल्याचे सांगितले.
शहर परिसरातील लहान मुलांसह नागरिकही पोहण्यासाठी जलतरण तलावाला जातात. मे महिन्याच्या सुट्टीमुळे पोहण्यासाठी तलावात गर्दीही असते. या तलावाच्या व्यवस्थापनासाठी पालिकेने ठेक्याद्वारे रोजंदारीवर मनुष्यबळ पुरवठा करुन घेतला आहे. दरम्यान, आज निवृत्त सहायक पोलिस निरीक्षक साताप्पा डांगे पोहण्यासाठी तलावात उतरले. पोहून झाल्यानंतर ते तलावातून बाहेर येताना गंजलेल्या व तुटलेल्या लोखंडी पायऱ्‍यामुळे त्यांचे दोन्ही तळपाय फाटून रक्तबंबाळ झाले. प्राथमिक उपचारासाठी धावपळ सुरु झाल्यानंतर तलावाच्या आवारातील फर्स्ट एड बॉक्सही रिकामाच असल्याचे आढळले. अखेर नातेवाईकांनीच त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार करुन घेतले.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच माजी नगरसेवक हारुण सय्यद यांनी पालिका प्रशासनाला तलावाकडे झालेल्या दूर्लक्षाबद्दल लेखी तक्रार दिली आहे. तलावातून बाहेर येण्यासाठी असलेल्या लोखंडी पायऱ्‍या गंजून पूर्णत: खराब झाल्या आहेत. याठिकाणी नवीन पायऱ्या बसवण्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच श्री. डांगे जखमी झाले असून या घटनेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT