कोल्हापूर

जागतिक चहा दिन विशेष

CD

जागतिक चहा दिन विशेष


कोल्हापूरकरांना लेमन, ब्लॅकसह गुळाच्या चहाची तलप!
शहरात मिळतात सहा प्रकारचे चहा; बासुंदी, ग्रीन आणि हर्बल टीलाही पसंती
नंदिनी नरेवाडी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : ताप असेल तर चहा, डोकेदुखी असेल तर चहा, टेन्शन असेल तर चहा, झोपायचं असेल तर चहा! चहा हे एक पेय आहे जे आपल्या सर्व भावनांशी निगडीत आहे. प्रत्येक गोष्टीत चहा पिण्याचे निमित्त शोधले जाते. चहाचे अनेक प्रकार आहेत. चहा विक्रेत्यांनी नाना संकल्पना वापरत ग्राहकांना आवडतील अशा फ्लेवरमध्ये चहा उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये लेमन टी, ब्लॅक टी, ग्रीन टी, गुळाचा चहा, बासुंदी चहा आणि हर्बल टी असे चहाचे प्रकार चहाप्रेमींना खुणावत आहेत. तसेच मातीच्या पारंपारिक मटक्यातील ‘कुल्लड चहा’, तंदुरी चहाही चहाप्रेमींच्या पसंतीस उतरत आहेत.

साधा, बासुंदी चहा
हा चहा म्हणजे आपण रोज घरात आणि हॉटेलमध्ये पितो तो चहा. हा चहा वेगवेगळ्या बँडमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. साध्या चहा टपरीवर बहुधा हाच चहा मिळतो. बासुंदी चहा करताना काही मसाले वापरून चहा चपऱ्यांवर हा चहा सर्रास मिळतो.

ग्रीन टी
या चहाला प्रोसेस्ड केले जात नाही. हा चहा रोपाच्या वरच्या कच्च्या पानांपासूनच तयार केला जातो. यात अँटी ऑक्सिडंट जास्त असतात. ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर असतो. विशेषत हा चहा दूध आणि साखर न घालता पिला जातो. यात कॅलरीही नसते. हल्ली चहागाड्यांवर ग्रीन टीही मागवला जातो. त्यांच्या मागणीमुळे चहाविक्रेतेही हा चहा बनवून देतात.

लेमन टी
लिंबाचा रस असलेला चहा आरोग्यासाठी चांगला असतो. कारण चहाचे अँटी ऑक्सिडंट शरीरात मिसळले जात नाहीत, ते लिंबाचा रस घातल्याने मिसळले जातात. या चहाचे आरोग्यदायी महत्व पाहता लोकआग्रहास्तव लेमन टी चहा व्यावसायिक करून देतात.

ब्लॅक टी
कोणताही चहा दूध आणि साखर कमी घालून केला की तो ब्लॅक टी बनतो. या चहाने पित्त फारसे होत नसल्याने चहागाड्यावरही हाच चहा पिण्यास चहाप्रेमी पसंती देतात.


गुळाचा चहा
या प्रकारात साध्या गुळाचा आणि सेंद्रीय गुळाचा चहा मिळतो. साखरेच्या दुष्पपरिणामांची दखल घेत गुळाचा चहा ही संकल्पना काही चहा विक्रेत्यांनी आणली. ती लोकप्रियही झाली. गुळाची खास चव या चहात उतरल्याने या चहालाही मोठी पसंती मिळते.

हर्बल टी
तुळस, अश्वगंधा, वेलदोडे, दालचिनी असे मसाले घालून हा चहा तयार होतो. बाजारात हर्बल टीचे पाकिट मिळत असल्याने चहाविक्रेत्यांनाही हा चहा बनविणे सोपे जाते. सर्दी खोकल्यावर गुणकारी म्हणूनही हा चहा ओळखला जातो. कॅफे, चहा हाऊसमध्ये अशा प्रकारचा चहा मिळतो.

कोट
पुर्वी चहा म्हणजे साधा असे समीकरण होते. सध्या चहाचे विविध प्रकार आले आहेत. ग्राहकांच्या आवडीनुसार त्यांना चहा बनवून देतो. अशा चहांना मोठी मागणीही आहे.
- स्नेहल मगदूम, चहा विक्रेत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT