कोल्हापूर

वाहतूक कोंडी

CD

04330
...

नंगीवली चौक परिसरात वाहतूक कोंडी

पाईपलाईन टाकण्यासाठी कोळेकर तिकटी ते पाण्याचा खजिना रस्ता बंद

कोल्हापूर, ता. २२ ः मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी ते नंगीवली चौक रस्त्यावर पाण्याची पाईप टाकण्याचे काम महापालिकेच्यावतीने आजपासून (ता. २२) सुरू केले. त्यामुळे रस्ता बंद झाल्याने लाड चौकातील रस्त्यावरून केएमटी, एसटीची ये-जा सुरू झाल्याने सकाळी वाहतुकीची कोंडी झाली. हिंद तरूण मंडळाजवळील तीनही रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली.
अमृत योजनेतून या मुख्य रस्त्यावर पाण्याची पाईप टाकण्याच्या कामाचे उद्‍घाटन रविवारी झाले. पण ठेकेदाराने आजपासून नंगीवली चौकातून काम सुरू केल्याने हा रस्ता बंद केला. त्यामुळे संभाजीनगरकडून मिरजकर तिकटीकडे जाणारी वाहतूक बिनखांबी गणेश मंदिर मार्गावर वळवण्यात आली. तर मिरजकर तिकटीकडून संभाजीनगरकडे जाणारी केएमटी, एसटीची वाहतूक दैवज्ञ बोर्डिंगकडून खरी कॉर्नरमार्गे लाड चौकाकडे सोडण्यात आली. हिंद तरूण मंडळ येथे पाण्याच्या खजिन्याकडे वळणारा रस्ता अरूंद आहे. त्यामुळे संभाजीनगरकडे जाणाऱ्या केएमटी तिथे आल्यानंतर चढ तसेच लगेच वळणावरच थांबत होत्या. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत होती. दोन्ही बाजूकडून बस आल्यास त्यापेक्षाही मोठी अडचण होत होती. रंकाळा, टिंबर मार्केटकडून तिथे येणाऱ्या वाहनांमुळेही कोंडी होत होती.
रस्ता बंद केला तरी वारे वसाहतीकडून जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा दिशादर्शक नसल्याने दुचाकीही सकाळी पाण्याच्या खजिन्याजवळील वाहतुकीच्या कोंडीत अडकलेले पहायला मिळाले. दुपारनंतर दुचाकीस्वार, चारचाकी वाहने बेलबाग, वारे वसाहत मार्गे संभाजीनगरकडे जात होती.
.....................

चौकट

केएमटी बस मार्गात बदल

कळंबा, आर.के.नगर, पाचगाव, चुये, येवती, वडकशिवाले बाचणी, सुर्वेनगर, राजोपाध्येनगर, जिवबानाना जाधव पार्क, आपटेनगर-कळंबा, राजोपाध्येनगर-बोंद्रेनगर या मार्गावरील बस बिंदू चौकापर्यंत नियमित मार्गे धावतील. तिथून पुढे कॉमर्स कॉलेज, उमा टॉकीज, गोखले कॉलेज, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर पुढे धावतील. येताना लाड चौक येथून नियमित मार्गे जातील. शाहू मैदान, कोळेकर तिकटी, शाहू बँक, नंगीवली चौक, रेसकोर्स नाका या बस स्टॉपवरील प्रवाशांना गोखले कॉलेज, हॉकी स्टेडियम येथे बस मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT