कोल्हापूर

दृष्टी नसतानाही कामाचा प्रकाश पाडा

CD

gad228.jpg
04242
अत्याळ : नेत्रदान चळवळीमार्फत आयोजित अंधांच्या रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचे सागर पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. एस. एन. पाटील, सुशांत चौगुले उपस्थित होते. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------
दृष्टी नसतानाही कामाचा प्रकाश पाडा
सागर पाटील : अत्याळला अंधांच्या रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : अंधांना कोणतीही गोष्ट शिकणे तसे सोपे नाही, पण अशक्य मुळीच नाही. दैनंदिन जीवनात लोकांची मदत घेण्याची वृत्ती सोडा. त्याऐवजी लोकांना मदत करा. दृष्टी नसतानाही समाजात तुमच्या कामाचा प्रकाश पाडा, असा सल्ला अंध उद्योजक सागर पाटील (मुंबई) यांनी दिला.
अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे नेत्रदान चळवळ व आयआयजी एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे अंधांसाठी रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. त्याच्या उद्‍घाटनप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सागर पाटील म्हणाले, ‘प्रत्येकाला सुरक्षित वाटणारी सरकारी नोकरी हवी आहे. पण, सरकारी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी आपणच सरकार का बनू नये, याचा विचार केला पाहिजे. आई-वडिलांनी अंधांना अडचणींपासून दूर ठेवण्याऐवजी त्या दाखवल्या पाहिजेत. तरच अंध त्या अडचणी समजून घेईल. त्यावरच त्याची जडणघडण अवलंबून आहे.’ न्यायाधीश पाटील यांनी अंधांच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ट्रस्टचे क्रीडा विभागप्रमुख सुशांत चौगुले यांचेही भाषण झाले. विविध गावांतील नेत्रदान चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, अंधांची रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा रविवारपर्यंत (ता. २८) चालणार आहे. कार्यशाळेत गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील १४ अंध सहभागी झाले आहेत. त्यांना एलईडी बल्ब, चार्जिंग बल्ब, बॅटरी, एलईडी माळा यासह सोलरवर चालणाऱ्या वस्तू बनवण्यास शिकवले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अशाप्रकारची कार्यशाळा प्रथमच होत आहे.
----------------
पेटंट घेणारा पहिला अंध
सागर पाटील म्हणाले, ‘अंधांसाठी इलेक्ट्रॉनिक क्षेत्र रुचणारे नाही, असे समजले जात होते. पण, मला या क्षेत्रात अधिक रुची होती. त्यामुळे याच क्षेत्रात काम सुरू केले. बझर टेस्टरसाठी पेटंट घेणारा देशातील पहिला अंध ठरलो. आतापर्यंत पाच पेटंट नावावर आहेत. इलेक्ट्रॉनिक कामात चायनीज वस्तू अजिबात वापरत नाहीत. भारतीय बनावटीलाच प्राधान्य दिले आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT