कोल्हापूर

रिक्षा संघटना निवेदन

CD

04362
...

परिवहन कार्यालयातील कारभार सुधारा

जिल्हा ॲटोरिक्षा संघर्ष समितीः अन्यथा आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर, ता. २२ ः परिवहन कार्यालात पंटरांचा सुळसुळाट झाला आहे. वाहनधारकांच्या कामांना विलंब होत आहे. यासाठी कार्यालयातील कामकाजात सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. असे न झाल्यास ॲटोरीक्षा संघटना मोठे आंदोलन करेल, असा इशारा जिल्हा जिल्हा ॲटोरिक्षा संघर्ष समितीने दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज परिवहन अधिकाऱ्यांना दिले.
निवेदनत म्हटले आहे, कार्यालयामध्ये परिवहन विभाग, परिवनेत्तर विभाग व अनुज्ञाप्ती विभाग असे कार्य चालते. परिवहनेत्तरचे मुख्य लिपिक यांनी खाली विभागाजवळ बसून कामकाज करणे अपेक्षित आहे. मात्र दुसऱ्या मजल्यावरून त्यांचे कामकाज चालते. वाहनधारकांना कामकाज करणे अडचणीचे ठरत आहे. त्याचप्रमाणे ज्या त्या दिवशी कागदपत्रांची पडताळणी होत नाही. कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनधारकांच्या व जनतेच्या सोयीसाठी एवढे मोठे कार्यालय जनतेच्या पैशातून बांधले आहे. परंतु कारभार उलटा चालला आहे. कार्यालयामध्ये पंटरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांचा बंदोबस्त करावा. वरील विषयात लक्ष घालून कामकाज सुधारावे अन्यथा ‘पंटर हटाव, वाहनधारक बचाव’ मोहीम घेतली जाईल. बायोमॅट्रीक हजेरी लागू करावी. कार्यालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात सुभाष शेटे, राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, ईश्वर चन्नी, मोहन बागडी, जाफर मुजावर, अविनाश दिंडे, शर्फुद्दीन शेख यांचा सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT