कोल्हापूर

तरूणपिढी देशाच्या शाश्वत विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’

CD

फोटो-04542
..........

तरूणपिढी देशाच्या शाश्वत
विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’

डॉ. प्रमोद पाटील; शिवाजी विद्यापीठात १६ वी राष्ट्रीय युवा संसद


कोल्हापूर, ता. २३ ः ‘तरुणपिढी ही राष्ट्रीय शाश्वत विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. त्यामुळे तरुणांनी मूल्याधिष्ठित जाणीवा मनाशी बाळगून राष्ट्रविकासाच्या कार्यात सहभाग घ्यावा’, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी मंगळवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठात १६ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या सभागृहातील स्पर्धेस निरीक्षक म्हणून केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव ए.बी. आचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. एस.बी. देओसकर उपस्थित होते.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘राष्ट्रीय युवा संसद उपक्रमाच्या माध्यमातून सांविधानिक लोकशाहीची मूल्ये युवा पिढीमध्ये रुजविण्याच्या दिशेने केंद्रीय मंत्रालय अतिशय सकारात्मक प्रयत्न करीत आहे. हा उपक्रम देशभरातील विद्यापीठांमध्ये राबविला जातो. यामुळे युवा पिढीच्या व्यक्तिमत्त्वाला नवे आयाम प्राप्त होतात, तसेच त्यांचे भवितव्यही मूल्याग्रही बनते. या माध्यमातून भारताची विविधतेमधील एकता आणि बहुसांस्कृतिकतेमधील एकात्मताही युवकांच्या जाणीवेच्या कक्षेमध्ये रुजतात. यातून भारताचा चांगला नागरिक म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होते.’
कार्यक्रमास प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, युवा संसदेमध्ये सुमारे तासभर विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ भारत’ ची शपथ घेतली. समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संतोष सुतार यांनी आभार मानले.
......

परस्परांबद्दलची मने स्वच्छ होणे आवश्‍यक

‘यंदा आपण ‘स्वच्छ भारत’ ही संकल्पना घेऊन हा उपक्रम साजरा करीत आहोत. केवळ भौतिक स्वच्छता करणे, यातून अभिप्रेत नसून स्वच्छतेचा संस्कार जनमानसात रुजणे आणि लोकांची परस्परांबद्दलची मनेही स्वच्छ व पारदर्शक होणे नितांत आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतला कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

Laptop Overheating : उन्हाळ्यात लॅपटॉप होतोय अधिक गरम? ब्लास्ट होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

Salman Khan: "टाइगर जिंदा है और..."; घरावरील गोळीबार प्रकरणानंतर भाईजान पोहोचला लंडनला, यूकेच्या खासदारांकडून फोटो शेअर

SCROLL FOR NEXT