कोल्हापूर

शिबिर समारोप

CD

04612

शिवकालीन युद्धकला आत्मसात करावी
संयोगिताराजे छत्रपती; प्रशिक्षण शिबिरचा समारोप

कोल्हापूर, ता. २३ : शिवकालीन युद्धकलेचा शालेय स्तरावर समावेश करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असे सांगत ही कला मराठ्यांच्या शौर्याच्या परंपरेचा मानबिंदू असून, ती प्रत्येकाने आत्मसात करावी, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी आज येथे केले.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस व कोल्हापूर मर्दानी खेळतर्फे आयोजित व्यक्तिमत्त्व विकास व युद्धकला क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी शिबिरातील उत्कृष्ट विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरविले. न्यू कॉलेजच्या प्रांगणात कार्यक्रम झाला.
संयोगिताराजे म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धकलेचा वापर स्वराज्य मिळविण्यासाठी केला. ही कला जोपासण्याबरोबरच त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. स्वसंरक्षणातून पाल्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचा पालकांचा विचार महत्त्वाचा आहे.’’
धर्मादाय आयुक्त शिवराज नाईकवडे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, बाबा महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, सुरेश देसाई उपस्थित होते. कोल्हापूर मर्दानी खेळचे संस्थापक अध्यक्ष विनोद साळोखे यांनी प्रास्ताविक केले.

चौकट
लेझीम, घोडेस्वारीची प्रात्यक्षिके
समारोपप्रसंगी हलगीच्या कडकडाटावर मुला-मुलींनी लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली. घोडेस्वारी व युद्धकलेची प्रात्यक्षिकेही येथे सादर करण्यात आले. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT