कोल्हापूर

असुविधांचे आगार, पर्यटक बेजार

CD

लोगो ः आजच्या टुडे १ वरून घेणे भाग - २
------------
05069
खिद्रापूर ः कोपेश्वर मंदिर परिसरातील वृक्षाभोवती असलेल्या कट्ट्याची अशी दूरवस्था झाली आहे.
-------------
असुविधांचे आगार, पर्यटक बेजार
पाणी, स्वच्छतागृहाच्या सुविधांकडे दुर्लक्ष; सुशोभिकरणावेर भर देण्याची गरज

अनिल केरीपाळे ः सकाळ वृत्तसेवा
कुरुंदवाड, ता. २६ ः खिद्रापूरला पर्यटन विकासाला भविष्यात खूप मोठी संधी आहे. पण त्यासाठी काही ठोस निर्णयांची आवश्यकता भासत आहे. या ठिकाणी सुशोभिकरणावर भर दिल्यास अधिक सुंदर असे हे ठिकाण पर्यटनस्थळ साकारण्यास मदत होईल. पर्यटकांची वर्दळ वाढत गेल्यास पर्यायाने परिसराचाही विकास होवून रोजगाराच्या नविन संधी निर्माण होवू शकतात. त्यासाठी सुरुवात पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहांच्या सुविधांची गरज आहे. जितक्या चांगल्या सुविधा, तितक्या पर्यटन वाढीला संधी असते. पण त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याचे विदारक चित्र आहे.
कोपेश्वर मंदिर हे वारसा स्थळ आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत हा परिसर येतो. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय मंदिराच्या आवारात दगडही हलवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मंदिराच्या भोवताली काही घरे आहेत. त्यांना पर्यायी जागा दिल्यास आत सुशोभिकरण करण्यास वाव आहे. एक घर पडक्या अवस्थेतच आहे. ते उतरवून घेण्याचेही काम झालेले नाही. मंदिराच्या दगडी संरक्षण भिंतीचे कामही अपूरे आहे. मंदिरात पिंपळ झाडाचा पारकट्टा आहे. त्याची दूरवस्था झाली आहे. त्याला दगडी चौथरा करुन चांगले रुप देता येवू शकते. पण अनेक वर्षापासून हा कट्टा पडक्या अवस्थेत आहे.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तर अतिशय वाईट आहे. पुणे, मुंबई, हैदराबादसह विविध भागातून पर्यटक येथे भेट देतात. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तीन ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात प्लास्टिक टाकी आहे. मात्र नळाबरोबर पाण्याचा पत्ता नाही. मंदिराबाहेर सिमेंटच्या टाक्या ठेवल्या आहेत. पण तेथेही पाणी नाही. शेवाळ व अस्वच्छता तेथे आहे. येथे येणा-या पर्यटकांना किमान स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. तथापि, याबाबत ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यटकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
स्वच्छतागृहाची अवस्था खूपच बिकट आहे. रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वच्छतागृह बांधून दिले आहे. मात्र तेथेही अस्वच्छतेचेच साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे त्याचा वापर करण्यास कुणी धजावत नाही. परिणामी, भाविक, पर्यटकांना शाळेतील सुविधेचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये सुधारणा होणार आहे की नाही, असा प्रश्न येथे आलेल्यांमधून उपस्थित होत आहे.
-------

पर्यटन माहिती केंद्र नावालाच
मंदिरासमोरच पर्यटन माहिती केंद्राच्या नावाने `एमटीडीसी`ने भव्य दगडी वास्तू उभारली आहे. राज्यभरातील पर्यटनविषयक माहितीचे दालन येथे होणार होते. मात्र फक्त वास्तू उभी राहिली, माहिती दालन काही प्रत्यक्षात अस्तीत्वात आले नाही. ही वास्तू २०१९ पासून ऊर्दू शाळेसाठी वापरली जाते. सध्या ही वास्तू धूळखात पडली आहे.
----------
अस्वच्छतेचा विळख्यात परिसर
मंदिर परिसराची स्वच्छता पूरातत्व विभागाचे कर्मचारी करतात. मात्र समोरील पार्किंग व परिसरात अस्वच्छता आहे. प्लास्टिक बाटल्या कागद पालापाचोळा जसाच्यातसा पडून आहे. ग्रामपंचायतीकडे येथील स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाही. नवीन कर्मचाऱ्‍यांकरवी करावे, तर बजेट अपूरे आहे. त्यामुळे बाहेरील परिसर अस्वच्छच राहतो आहे. पर्यटनवाढीवर या गोष्टी नक्कीच परिणाम होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT