कोल्हापूर

गर्भपाताची माहिती न देणाऱ्या

CD

गर्भपाताची माहिती न देणाऱ्या
पती- पत्नीवर कारवाई होणार

जिल्हाधिकारी राहुल रेखावार : गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी करा

कोल्हापूर, ता.२८ : पहिली एक किंवा दोन मुली असणाऱ्या गरोदर मातेचा १२ आठवड्यानंतर गर्भपात झाल्याचे निदर्शनास आल्यास, अशा महिलांच्या गर्भपाताबाबतची योग्य ती माहिती आरोग्य विभागामार्फत घ्यावी. या महिलेचा गर्भपात कोठे व कशामुळे झाला, याची खरी माहिती न देणाऱ्या पती- पत्नी व संबंधित कुटुंबियांवर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. जिल्हा स्तरीय दक्षता पथक समिती (पीसीपीएनडीटी) ची जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठक वेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी करा. कोणत्याही केंद्रामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होत नसल्याची खातरजमा करुन घ्या. त्याचबरोबर सर्व सोनोग्राफी केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची खात्री करा. सीसीटीव्ही नसणाऱ्या केंद्रांमध्ये तत्काळ सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही करा. गरोदर महिलांची पहिल्या तिमाहीतील नोंदणी वेळेत होत असल्याची खात्री करा. या सर्व नोंदीची माहिती खासगी सोनोग्राफी केंद्र धारकांनी आरोग्य विभागाला देणे आवश्यक आहे. खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची यादी घेवून शैक्षणिक अर्हता नसणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध तात्काळ कारवाई करा. गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.’
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने, पीसीपीएनडीटी कायदा सल्लागार गौरी पाटील तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT