कोल्हापूर

पाटाकडील अ उपांत्य फेरीत

CD

फोटो- 05627
--
लोगो- अटल चषक फुटबॉल स्पर्धा
-
पाटाकडील अ उपांत्य फेरीत 
दिलबहार तालीम मंडळ संघावर ४ गोलने विजय

कोल्हापूर, ता. २८ :  तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने दिलबहार तालीम मंडळ संघावर ४ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियम वर स्पर्धा सुरु आहे. आक्रमक चढाया करणाऱ्या पीटीएम अ संघाने दिलबहार संघावर संपूर्ण सामन्यात दबाव निर्माण करून ठेवला. दरम्यान दिलबहारकडून काही आक्रमक चाली  रचण्यात आल्या. मात्र, त्यात यश आले नाही. पीटीएमकडून सामान्यांच्या ३६ व्या मिनिटाला ओंकार मोरेच्या पासवर सोमाडी याने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात लगेचच ४६ व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरच्या पासवर सोमाडी याने हेडद्वारे गोल करत वैयक्तिक व  संघासाठी दुसऱ्या गोलची नोंद केली.  यानंतर चेंडू मैदानभर फिरता राहिला. आक्रमण प्रति आक्रमण चालू राहिले. मात्र, सामन्याच्या ६० व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर ओंकार मोरे याने गोलजाळी भेदत तिसऱ्या गोलची नोंद केली. तर थोड्याच वेळात ७९ मिनिटाला ओंकार मोरे ने संघासाठी चौथा तर वैयक्तिक दुसऱ्या गोलाची नोंद करत संघाला उपांत्यफेरीत प्रवेश मिळवून दिला. 

चौकट
उत्कृष्ट असे
सामनावीर-ओंकार मोरे : पीटीएम 
लढवय्या-व्हॅलेंटाईन : दिलबहार 

चौकट
आजचा सामना 
सायंकाळी ४ ः प्रॅक्टिस क्लब विरुद्ध बालगोपाल तालीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT