कोल्हापूर

बाजार कर वसूलीचा ठेका रद्द करा

CD

gad296.jpg
05741
गडहिंग्लज : बाजार कर वसूलीचा ठेका रद्दच्या मागणीचे निवेदन दिलीप माने, संतोष चिकोडे, भरत जाधव आदींनी श्‍वेता सुर्वे व सुधीर पोतदार यांना दिले.
-------------------------------------------------
बाजार कर वसूलीचा ठेका रद्द करा
ठाकरे शिवसेनेतर्फे गडहिंग्लज पालिकेवर धडक; ठिय्या आंदोलनाचा इशारा
मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : भाजीपाला उत्पादकांसह विविध विक्रेत्यांकडून अरेरावी आणि दादागिरी करुन बाजार कर वसूली करणाऱ्‍या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी आज ठाकरे शिवसेनेच्या पुढाकाराने विक्रेत्यांनी पालिका कार्यालयावर धडक दिली. मुख्याधिकाऱ्‍यांचे दालन घोषणांनी दणाणून गेले.
बाजार कर वसूली ठेकेदाराकडून अधिक रक्कमेची वसूली सुरु असल्याच्या तक्रारी वाढल्याने ठाकरे शिवसेनेने आज पालिकेवर धडक दिली. मुख्याधिकाऱ्‍यांच्या दालनात शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. त्यानंतर नगर अभियंता सुधीर पोतदार, कार्यालयीन अधीक्षक श्‍वेता सुर्वे यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. ठेकेदाराची दादागिरीची भाषा सुरु असून त्याचा ठेका रद्दच झाला पाहिजे. मुख्याधिकाऱ्‍यांशी चर्चा करुन जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत एकही विक्रेता पावती फाडणार नाही, असा इशाराही दिला.
दरम्यान, विक्रेत्यांच्या बैठकीत शहरप्रमुख संतोष चिकोडे म्हणाले, ‘शहरात ठेकेदाराची दादागिरी खपवून घेणार नाही. दहा-वीस रुपयांऐवजी ५० व १०० रुपयांची वसूली ठेकेदाराकडून सुरु आहे. प्रशासनाला हा ठेका रद्द करावाच लागेल. मुख्याधिकाऱ्‍यांनी हा निर्णय घेईपर्यंत कोणीही विक्रेत्यांनी एक रुपयाही देवू नये. रस्त्यावर बसून शेतमालाची विक्री करुन पोट भरणाऱ्‍या शेतकऱ्‍यांसमोर ठेकेदाराची दादागिरी शिवसेना चालू देणार नाही. विक्रेत्यांच्या पाठीशी ठाकरे शिवसेना खंबीरपणे उभी राहील. प्रसंगी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी तालुकाप्रमुख दिलीप माने, युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, विलास यमाटे, उपशहरप्रमुख संदीप कुराडे, बाळू कुंभार, रवींद्र यमाटे, काशिनाथ गडकरी, शाखाप्रमुख सुशिल विभुते, संभाजी यडूरकर, उपतालुकाप्रमुख भरत जाधव, मंथन डांग, सुमित बाणेकर आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT