कोल्हापूर

बालाजी विद्यालयाचे यश

CD

ich302.jpg
05862
इचलकरंजी : बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील बारावी परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
बालाजी विद्यालयाचे यश
इचलकरंजी : बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने बारावी परीक्षेत यश मिळवले. विज्ञान शाखेचा निकाल १०० तर कॉमर्सचा निकाल ९७.६३ टक्के लागला. अनुक्रमे विज्ञान शाखेत सारांश जाजू (७४.३३ टक्के), सुदीप कुरूंदवाडे (७३.८३), धनश्री पवार (७२.६७), अपूर्वा पवार (७२.६७). कॉमर्स शाखेत मधुमती गौंडगिरी (८८.५०), शिवानी प्रजापती (८८), स्नेहल घायतिडक (८७), समर्थ उकली (८६.५०) यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे, सचिव महेश कोकीकाळ, प्राचार्या एम. एस.रावळ यांच्याहस्ते सत्कार केला.
----------
‘डीकेएएससी’मध्ये गुणवंतांचा सत्कार
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयातील बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कला विभागाचा निकाल ७२.४१ टक्के, वाणिज्य विभाग ८३.५५, तर विज्ञान विभागाचा निकाल ९३.८२ टक्के लागला. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते तीनही शाखेतील अनुक्रमे पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. एम. बी. पाटील, प्रा. शशिकांत कुंभार, प्रा. एम. एम. पाटील, प्रा. एस. के. पाटील, प्रा. मेजर मोहन वीरकर, सुनिल महाडिक आदी उपस्थित होते.
-----------
ich304.jpg
05864
सैनिक टाकळी : येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला.
सैनिक टाकळीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
कुरूंदवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या १९९८-९९ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. २४ वर्षांनी एकत्र येत माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मैत्री ही सोनेरी धाग्यांनी विणलेली असते. त्यातील प्रत्येक धागा हा विश्‍वासाचा असतो. यामुळेच मैत्री अधिक दृढ होत जाते, असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांनी केले. डी. एम. शेळके, उदय पाटील, एम. एम. धुमाळे, ए. एच. पाटील आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याकडून गुरूजणांचा सत्कार केला. माजी विद्यार्थ्यांचा गौरव केला. सुत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले. आभार ए. ए. इंगवले यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT