कोल्हापूर

‘प्राथमिक शिक्षक’साठी दुरंगी लढत

CD

‘प्राथमिक शिक्षक’साठी दुरंगी लढत
४१ अर्ज माघार; संस्थापक पॅनेलला पतसंस्था बचावचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : येथील पी. सी. पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेसाठी दुरंगी लढत होत आहे. सतरा जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीच्या आज शेवटच्या दिवशी ४१ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले.
सत्ताधारी संस्थापक पॅनेलला पतसंस्था बचाव पॅनेलने आव्हान दिले आहे. पतसंस्थेसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. निर्धारित कालावधीत ७५ अर्ज दाखल झाले होते. छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले होते. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. यातील ४१ अर्ज माघार घेतले. सत्ताधाऱ्यांनी संस्थापक पॅनेलची रचना केली आहे. विरोधकांनी पतसंस्था बचाव पॅनेलच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले आहे. पतसंस्थेचे ५५१ मतदार आहेत. १० जूनला डॉ. झाकीर हुसेन विद्यालयात सकाळी आठ ते सायंकाळी चारपर्यंत मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एफ. डी. जमादार काम पहात आहेत.
निवडणूक रिंगणातील पॅनेलनिहाय उमेदवार असे- पी. सी. पाटील गुरुजी संस्थापक पॅनेल- विनायक पोवार, संभाजी पाटील, राजकुमार शिंगटे, पांडुरंग भोईटे, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, उज्ज्वल कुंभार, आनंदा आजगेकर, विष्णू कुराडे, फयाज तहसीलदार (सर्वसाधारण), पुष्पावती दरेकर, मालुताई जाधव (महिला), मारुती कोलुनकर (इतर मागास), अशोक कांबळे (अनुसूचित जाती), राजेंद्र गोणी (विशेष मागास).
पी. सी. पाटील गुरुजी पतसंस्था बचाव पॅनेल- विष्णू बेनके, अरविंद पाटील, आनंदा करंबळकर, विलास माळी, पुंडलिक खांडेकर, अशोक जाधव, तानाजी जत्राटे, राजेंद्र सुतार, राजेंद्र मांडेकर, पांडुरंग सुतार, शिवाजी पाटील, रावसाहेब आंबुलकर (सर्वसाधारण), शुभांगी नाईक, महादेवी सावंत (महिला), ईश्वर शिंदे (इतर मागास), मधुकर जरळी (अनुसूचित जाती), कामान्ना नाईक (विशेष मागास).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT