कोल्हापूर

शिवसेना बैठक

CD

06639
कोल्हापूर ः रस्ते कामांच्या निविदांबाबत शिवसेनेच्या (ठाकरे गट) शिष्टमंडळाची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत बैठक झाली.

महापालिकेचा कारभार हॉटेलातून
शिवसेनेचा आरोप; १०० कोटींच्या चार निविदा टक्केवारीसाठी
कोल्हापूर, ता. २ ः नगरोत्थान अभियानातून शहरातील रस्त्यांसाठी आलेला १०० कोटीच्या निधीसाठी शासनाकडून एकच निविदा काढण्याचे निर्देश आहेत. पण अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये बसून चार-चार निविदा काढण्याचा निर्णय घेतला. ना हरकत प्रमाणपत्रेही हॉटेलात बसूनच दिली आहेत. टक्केवारीसाठी हा प्रकार होत असून महापालिकेचा कारभार हॉटेलातून चालत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने (ठाकरे गट) आज महापालिका प्रशासनावर केला. प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.
निविदाप्रक्रिया प्रकरणी जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख सुनील मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी बैठक झाली. या वेळी कारभारावर जोरदार टिका करताना पवार व मोदी म्हणाले, ‘‘रस्त्यांच्या कामासाठी एकच निविदा काढणे बंधनकारक असताना चार निविदा काढण्याचा प्रस्ताव शासनाकडे कसा पाठवला गेला? कोणाच्या आग्रहाखातर हे प्रस्ताव पाठवले गेले आहेत. स्थानिक आमदारांचे मुद्दे बाजूला ठेवून पराभुतांच्या मुद्द्यांची कशी काय अंमलबजावणी केली जाते. प्रशासनाला काही अधिकार आहे की नाही?’’ या वेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर यांनी दिलेली पत्रे शिष्टमंडळाला वाचून दाखवली. प्रशासक डॉ. बलकवडे यांनी कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
पवार, मोदी म्हणाले, ‘‘हॉटेलात जाऊन बैठक घेऊन अधिकारी २५ कोटींच्या चार निविदा काढण्याचे ठरवतात. त्या हॉटेलात चार ठेकेदार राहिले होते. यापूर्वी १७ ना हरक प्रमाणपत्रे हॉटेलात बसूनच दिली आहेत. जिथे जास्त टक्केवारी तिथे कामे केली जातात. स्मशानभूमी, शववाहिकासारखी कामे केली जात नाहीत. त्यामुळे बेंच व ओपन जिमच्या कामांचे ऑडिट केले पाहिजे. कारण ४० टक्के बेंच कायब आहेत. अधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या राजकारणात भाग घेऊ नये. नाही तर जगणं मुश्‍किल होऊन जाईल.’’ या वेळी धनाजी दळवी, हर्षल सुर्वे, प्रतिज्ञा उत्तुरे, राजेंद्र पाटील,दीपाली शिंदे, पूनम फडतरे, स्मिता सावंत, अभिजित बुकशेट,योगेंद्र माने आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT