कोल्हापूर

कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमी अ व कै.मालती पाटील क्रिकेट ॲकॅडमी अंतीम फेरीत

CD

आण्णा मोगणे ॲकॅडमी अ,
पाटील ॲकॅडमी अंतिम फेरीत
कोल्हापूर, ता. २ : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व यादव बंधु (शिरोळ) पुरस्कॄत माजी आमदार स्व. दिनकरराव यादव चषक अ गट क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामना कै.आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमी अ विरूध्द कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमी ब यांच्यामध्ये झाला. सामन्यात कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमी अ ने १ विकेटनी विजय मिळवला. प्रथम फलदांजी करताना सहारा स्पोर्टस ब ने ३७.२ षटकांत सर्वबाद १७९ धावा केल्या. यामध्ये अभिषेक आंब्रे ६०, अभिनंदन गायकवाड ५८ धावा केल्या. सहारा स्पोर्टस अ कडून श्रेयस चव्हाणने ४, सुदर्शन कुंभार व संदीप पाटील यांनी प्रत्येकी २, शुभम माने व रवि चौधरी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना सहारा स्पोर्टस अ ने २२.४ षटकांत ९ बाद १८० धावा केल्या. यामध्ये सुदर्शन कुंभार ४२, स्मित पाटील ४१, संदीप पाटील नाबाद ३३ धावा केल्या. सहारा स्पोर्टस ब कडुन साईप्रसाद मानेने ६, प्रथमेश साठेने २, सुरज जाधवने १ बळी घेतला. 
दुसरा उपांत्य सामना कै. मालती पाटील क्रिकेट ॲकॅडमी विरूध्द भिडे स्पोर्टस यांचेमध्ये झाला. सामन्यात कै. मालती पाटील क्रिकेट ॲकॅडमी ७ विकेटनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना भिडे स्पोर्टस् ने ३३ षटकांत सर्वबाद १०८ धावा केल्या. यामध्ये सचिन आर्दाळकर २४, स्वयंम भंडारी १७, हर्षजीत पाटील १५ धावा केल्या. कै. मालती पाटील ॲकॅडमीकडून प्रथमेश बाजारीने ४, अनिकेत नलवडे ३, तुषार पाटील २ व कपिल सागांवकरने १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना कै. मालती पाटील ॲकॅडमीने १७.१ षटकांत ३ बाद ११२ धावा केल्या. यामध्ये विश्‍वजीत जगताप ४०, अनिकेत नलवडे ३०, प्रथमेश बाजारी नाबाद १७ धावा केल्या. भिडे स्पोर्टस् कडुन सचिन अर्दाळकर २, वैभव चौगुले १ बळी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT