कोल्हापूर

आरोग्य विभागाच्या सहा योजनांचा समावेश

CD

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

आरोग्य विभागाच्या सहा योजनांचा
‘शासन आपल्या दारी’ मध्ये समावेश

जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ.साळे यांची माहिती

कोल्‍हापूर, ता.५: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या सहा योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यात आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड, आयुष्यान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया यांच्या माध्यमातून जास्‍तीत जास्‍त लोकांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले. ते आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा महासंकल्प करण्यात आला आहे. जिल्‍ह्यात तपोवन मैदानात ११ जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांची ने-आण करणे, नाष्टा-पाणी, जेवण ओआरएस पावडर या बाबींचे योग्य ती व्यवस्था करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

तपोवन मैदानातील मेळावा संपल्यानंतर लाभार्थींना त्यांच्या गावापर्यंत व घरापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तपोवन मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यक्रमाचे नियोजन तसेच शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल, आरोग्य विभागाचा कॅम्प व वाहन व्यवस्थेबाबतही सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमस्थळी कार्डीयाक ॲम्‍ब्युलन्‍सची व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमस्थळी रक्तदान शिबिर, जिल्हा रुग्णालयामध्ये २५ खाटा राखीव ठेवणे याबाबत सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थींना आणणे व त्यांना त्यांच्या गावी सोडणे यासाठी प्रत्येक तालुक्याला ६० बसेस देण्यात येणार आहेत. गगनबावडा तालुक्यासाठी ३५ बसेस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने, डॉ.शुभांगी रेंदाळकर, डॉ. रणजीत जाधव, महेश जगदाळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT