कोल्हापूर

उत्तूरला मिरवणुकीने शिवराज्याभिषेक सोहळा

CD

उत्तूरला मिरवणुकीने
शिवराज्याभिषेक सोहळा
उत्तूर, ता. ६ : ग्रामपंचायत उत्तूर व ग्रामस्थांतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मिरवणुक काढली. ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात व विविध घोषणा देत कलश मिरवणूकही काढली.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणूकीला सुरुवात झाली. पारंपरिक वाद्ये वाजवीत विठ्ठल रुक्मिणी सांप्रदायिक भजनी मंडळ, उत्तूर विद्यालयाचे झांझ पथक, पेद्रेवाडी येथील जिजाऊ महिला लेझीम पथक मिरवणूकीत सहभागी झाले होते. ग्रामपंचायत आवारातील शिव पुतळ्यास सरपंच किरण आमणगी व मयुरी आमणगी यांच्याहस्ते अभिषेक घातला. नागरिकांना ग्रामपंचायतीतर्फे मोफत रोपे दिली. या रोपांचे आजपासून ६ जून २०२४ अखेर योग्य संगोपन करणाऱ्या दहा नागरिकांना सिद्धिविनायक फाउंडेशनतर्फे पारितोषिक देणार असल्याचे सदस्य मंदार हाळवणकर यांनी जाहीर केले.
उपसरपंच समीक्षा देसाई, जिल्हा परिषद माजी सदस्य उमेश आपटे, माजी सभापती वसंतराव धुरे, पंचायत समिती माजी सदस्य शिरीष देसाई, मारुती घोरपडे, धोंडीराम सावंत, श्रीपती यादव, स्वागत परुळेकर, प्रवीण लोकरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT