कोल्हापूर

गड-किसान संघ

CD

07827

गडहिंग्लज : भारतीय किसान संघातर्फे उपअभियंता डी. आर. धोंडफोडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बसवराज हंजी, संदीप पाटील, के. डी. पाटील उपस्थित होते.
----

उपसाबंदीप्रश्नी बैठक बोलवाः भारतीय किसान संघ

गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदीवरील उपसाबंदीप्रश्नी कालवा सल्लागार समितीची बैठक बोलवावी. या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी भारतीय किसान संघातर्फे करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
गडहिंग्लज उपविभागात मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे काही अंशीच पेरण्या झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत चित्री मध्यम प्रकल्प व हिरण्यकेशी नदीतील उपलब्ध पाण्याची तंतोतंत माहिती उपलब्ध करावी. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात यावे आणि उपलब्ध पाण्याचा शेतीच्या सिंचनासाठी उपयोग करावा. यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक बोलविण्यात यावी. यात चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. उपअभियंता डी. आर. धोंडफोडे यांनी निवेदन स्वीकारले. भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष बसवराज हंजी, रामभाऊ पाटील, शिवाजी पाटील, शिवाजी झुरळे, रघुनाथ चौगुले, चंद्रशेखर मोळदी, पुंडलिक गवळी, संदीप पाटील, के. डी. पाटील, उमाशंकर मोहिते यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT