कोल्हापूर

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची फेरनिवड

CD

फोटो-08030
08035
................
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या
अध्यक्षपदी ललित गांधी यांची फेरनिवड

वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा

कोल्हापूर, ता. ७ ः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची, तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अध्यक्षपदासाठी ललित गांधी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी अनिलकुमार लोढा, करुणाकर शेट्टी आणि उमेश दाशरथी यांचे अर्ज दाखल झाले. त्यापैकी शेट्टी, दाशरथी यांनी अर्ज मागे घेतल्याने वरिष्ठ उपाध्यक्षपदी लोढा यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चेंबरचे सरकार्यवाह सागर नागरे यांनी काम पाहिले. ललित गांधी गेल्या २१ वर्षांपासून ‘महाराष्ट्र चेंबर’मध्ये कार्यरत असून गव्हर्निंग काऊन्सील सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. अनिलकुमार लोढा यांनी महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे दोनदा उपाध्यक्षपद भूषविले आहे. ते गेल्या २० वर्षापासून चेंबरशी संलग्न आहेत.
...
कोट
‘शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या राज्याच्या शिखर संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी पुन्हा मिळणे ही दुर्मिळ व महत्वपूर्ण घटना आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह चेंबरच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागांतील व्यापार-उद्योग-कृषी व कृषीपूरक उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार आहे.
-ललित गांधी
...

राजभवनात १६ जूनला सोहळा
दरम्यान, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे ५० वे सत्र राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. येत्या १६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये दिमाखदार सोहळ्याचे नियोजन केले आहे. निर्वाचित अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्षांचा पदग्रहण समारंभ या वेळी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT