कोल्हापूर

घरफाळा सर्व्हे

CD

घरफाळ्याविना १८ मिळकती
सर्व्हेक्षणात माहिती उघड; ५६ मिळकती तपासल्या
कोल्हापूर, ता. ८ ः घरफाळा विभागाने सुरू केलेल्या सर्व्हेत दुसऱ्याच दिवशी तब्बल १८ मिळकती बिगर घरफाळ्याच्या आढळल्या. चार विभागीय कार्यालयांच्या अखत्यारित नेमलेल्या २१ पथकांकडून ११४ मिळकतींची पाहणी करण्यात आली. बुधवारी ५६ मिळकती तपासल्या होत्या.
वीस वर्षापूर्वी झालेल्या सर्व्हेनंतर आता सर्व्हे केला जात आहे. त्यातून घरफाळा लागू नसलेल्या, क्षेत्रफळ वाढवलेल्या मिळकतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर समोर येण्याची शक्यता आहे. सध्या एक लाख ५७ हजारावर मिळकती आहेत. त्यात मोठी वाढ होऊ शकते. तसेच महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. प्रत्येकी दोन कर्मचारी असलेल्या २१ पथकांनी बुधवारपासून सर्व्हे सुरू केला असला तरी दगडफेकीच्या घटनेमुळे फार कमी प्रमाणात सर्व्हे झाला. गुरूवारी मात्र तपासलेल्या मिळकतींच्या संख्येत वाढ झाली. दिवसभरात चारही विभागीय कार्यालयांतर्गत ११४ मिळकतींची पाहणी केली. त्यात दहा वाढीव बांधकाम झालेल्या तर आठ नवीन अशा १८ मिळकती आढळल्या. त्यांना घरफाळा लागू करण्यात येणार आहे.
याप्रकारे सर्व मिळकतींचा सर्व्हे करण्याबरोबरच नवीन मिळकती शोधल्या जाणार आहेत. यामुळे घरफाळ्याच्या उत्पन्नात या आर्थिक वर्षात मोठी वाढ होण्याची आशा आहे. त्यासाठीच इतर विभागातीलही अनेक कर्मचारी या सर्व्हेसाठी नेमले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT