कोल्हापूर

जिल्‍हा परिषदेतील राष्‍ट्रवादीची अवस्‍था दयनीय

CD

लोगो- जिल्‍हा परिषद

सर्व तालुक्यांत ताकद निर्माण करण्याचे आव्‍हान
कोल्‍हापूर, ता. ३ : राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत रहायचे की अजित पवार यांच्यासोबत जायचे, याबाबत कार्यकर्ते संभ्रमात आहेत. जिल्‍ह्यातील पक्ष वा गटाची ताकद जिल्‍हा परिषदेतील सत्तेवर ठरते. मावळत्या सभागृहातील सत्ता राष्‍ट्रवादीने काँग्रेसच्या सोबतीने मिळवली. मात्र राष्‍ट्रवादीची जिल्‍हा परिषदेतील स्‍थिती फारशी प्रभावी नाही. मावळत्या सहभागृहात ६७ पैकी केवळ ११ सदस्य राष्‍ट्रवादीकडे होते. यातील काही सदस्य इकडे-तिकडे झाल्याने ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत उरली. त्यामुळे ताकद दाखवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांना कंबर कसावी लागणार आहे.
गत महिन्यात राष्‍ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळीच राष्‍ट्रवादीची अवस्‍था दयनीय असल्याचे व हा पक्ष साडेतीन तालुक्यांचा असल्याचा टोला त्यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला होता. मात्र त्याच मुश्रीफांना मंत्री मंडळात घेऊन पवार यांनी नवा डाव टाकला आहे. मंत्री मुश्रीफ अजित पवारांसोबत गेल्याने खुद्द मुश्रीफ यांच्याच कार्यकर्त्यांना मोठा धक्‍का बसला आहे. त्यांच्या या निर्णयावर पहिल्या फळीतील नेते, कार्यकर्तेही नाराज आहेत. मात्र, मुश्रीफ यांना नेते मानत असल्याने त्यांना पुन्‍हा ताकद दाखवावी लागणार आहे. राजकीय ताकतीचे सर्वात मोठे केंद्र जिल्‍हा परिषद असल्याने याकडे सर्वांचे लक्ष असेल. मागच्या सभागृहात राष्‍ट्रवादीचे ६७ पैकी केवळ ११ सदस्य विजयी झाले. यातील एक सदस्य आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या गटासोबत राहिले.
राष्‍ट्रवादीकडून उपाध्यक्ष राहिलेल्या जयवंतराव शिंपी यांचे मंत्री मुश्रीफ यांच्याशी असलेले सख्य जगजाहीर आहे. जिल्‍हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या घरातही जिल्‍हा परिषद सदस्य असताना निधी वाटपात त्यांच्यावर अन्याय झाला, तर उपाध्यक्षपद व निधी नाकारल्याने शाहूवाडीचे सदस्य विजय बोरगे नाराज झाले. राधानगरीतून माजी सदस्या सविता भाटळे यांचे पती राजू भाटळे यांनीही पक्षापासून फारकत घेतली आहे. भुदरगडमधून जीवन पाटील यांनाही डावलल्याने त्यांनीही बाजूला राहणे पसंत केले आहे.

चौकट
बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण अधिक
राष्‍ट्रवादीत नाराज असलेल्या सदस्यांशी मंत्री मुश्रीफ यांनी कधीही संपर्क केला नाही. सदस्यांचा अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्‍न केला नाही. कागलचे कारभारी सांगतील त्या पद्धतीने पक्ष चालवणे त्यांना अडचणीचे ठरले आहे. मागील काही काळात राष्‍ट्रवादीचे बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण अधिक झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT