कोल्हापूर

शहर वाहतूक बैठक

CD

15567
कोल्हापूर : शहरातील वाहतूक समस्यांवर उपाययोजनांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याशी आमदार ऋतूराज पाटील यांनी चर्चा केली.

शहरातील वाहतूक समस्येवर
कायमस्वरूपी योजना करा
आमदार पाटील, आमदार जाधव यांच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : शहरातील वाहतूक समस्या संदर्भात प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील विविध प्रश्‍नासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
शहरातील रंकाळा टॉवर येथील जाऊळाचा गणपती चौक येथे वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक आणि नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही बैठक झाला. जाउळाचा गणपती चौक या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करा. शहरातील पार्वती टॉकीज परिसर, बागल चौक आणि विद्यापीठ रोड या मार्गावर असणारे व्यावसायिक आणि ग्राहकाच्या वाहनांच्या पार्किंगबाबत नियोजन करा. सेफ सिटी अंतर्गत कोल्हापूर शहरात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद असल्याने हे कॅमेरे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत तसेच तपोवन परिसर, वसंत विश्वास पार्क याठिकाणी देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवा, अशा सूचनाही बैठकीत केल्या. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वाहतूक कोंडी संदर्भात तातडीने कार्यवाही करू. त्याशिवाय येत्या पंधरा दिवसांमध्ये या संदर्भात संबंधित यंत्रणांनी बैठक घेण्याची ग्वाही दिली. येत्या सहा महिन्यांमध्ये आठ हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीला वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील, माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर आदी उपस्थित होते.श्‍व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

SCROLL FOR NEXT