कोल्हापूर

सांस्कृतिक भवनासाठी निधीची मागणी

CD

06048
जयसिंगपूर: वीर जवान शिलाफलकाच्या अनावरणप्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (छायाचित्र: राहुल मोरे, जयसिंगपूर)
-----------------
सांस्कृतिक भवनासाठी निधीची मागणी
इचलकरंजी : वाल्मीकी म्हेतर सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्तीसह व्यायाम शाळेसाठी ५० लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करून द्यावा, या मागणीचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांना दिले. निवेदनात म्हेतर समाजासाठी तीस वर्षांपूर्वी समाज मंदिर तथा सांस्कृतिक भवन बांधले आहे. त्याच्या वरील मजल्यावर व्यायामशाळा आहे. त्यामुळे येथे सुरू असलेल्या अंगणवाडीस जागा अपुरी पडत आहे. इमारतीचा आणखी एक मजला वाढवावा. व्यायामाचे आधुनिक साहित्य मिळावे. भवनाची दुरुस्ती केली जावी. यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करावा, असे नमूद केले आहे. तानाजी अनंतपुरे, नरेश सावंत, धनराज पाल, विजय चव्हाण, राजू भंडारी, अंबादास गदवाळकर, रमेश रजपूत उपस्थित होते.
-------------
इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्था वार्षिक सभा
इचलकरंजी : इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संत नामदेव भवन येथे झाली. अहवाल सालात दिवंगत सभासद व मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. संस्थेचे अधिकृत भागभांडवल ६९ लाख १५ हजार असून एकूण निधी ४ कोटी २८ लाख, ठेवी १५ कोटी ३२ लाख, येणे कर्ज ११ कोटी ४१ लाख, गुंतवणुक १० कोटी १५ लाख, खेळते भांडवल २३ कोटी ६५ लाख असून संस्थेला अहवाल वर्षात उत्पन्न २ कोटी २० लाख झाले आहे. निव्वळ नफा ६० लाख ५८ हजार इतका झाला आहे. नफ्यातील सातत्यामुळे या वर्षी देखील सभासदांना १५ टक्के लाभांश देऊन १० वर्षांची परंपरा कायम राखली असल्याचे संस्थेचे चेअरमन सूर्यकांत साखरे यांनी संगितले. या वेळी आमदार प्रकाश आवाडे, राजगोंडा पाटील, गजानन लोंढे, विलास गाताडे, बाळासाहेब बरगाले यांच्यासह सर्व संचालक, सेवकवर्ग उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT