24218
चंदगड ः आंदोलकांना लेखी आश्वासन देताना तहसीलदार राजेश चव्हाण.
---
लेखी आश्वासनानंतर
हेरे सरंजामप्रश्नी आंदोलन मागे
चंदगड, ता. १८ ः हेरे सरंजाम अंतर्गत जमिनी नावावर करण्यासाठी महसूल विभागाकडून चालढकल होत असल्याच्या निषेधार्थ पंधरा ऑगस्टपासून येथे पुकारण्यात आलेले बेमुदत उपोषण आंदोलन आज तहसीलदार राजेश चव्हाण यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. जमिनीसंदर्भात कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी तलाठ्यांनी घेण्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली असल्याने त्यावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेत असल्याचे रवी नाईक, रणजित गावडे व अनिल रेगडे यांनी सांगितले.
हेरे सरंजाम अंतर्गत जमिनी कसणाऱ्या कुळांना मालकी हक्क द्यावा, असा शासन निर्णय झाला असला तरी महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्यांची कुचंबना केली जाते. विविध प्रकारचे उतारे मागवून कामात अडथळा निर्माण केला जातो, तो होऊ नये. कागदपत्रांची जबाबदारी प्रशासनानेच घ्यावी या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनाबाबत प्रशासनाला पत्र देऊनही त्या दिवसापर्यंत काहीच दखल घेतली नाही. त्या दिवशी मात्र आंदोलन मागे घेण्याबाबत प्रयत्न चालवले. मात्र निर्णय होईपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. १६ तारखेला सुटी असल्यामुळे प्रशासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी तिकडे फिरकले नाहीत. आंदोलकांची प्रकृती ढासळू लागल्याने तहसीलदार चव्हाण यांनी पुन्हा त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.