कोल्हापूर

एसटी चालकांचा सत्कार

CD

विनाअपघात सेवा देणाऱ्या
एसटी चालकांचा सत्कार

कोल्हापूर, ता. १८ ः सुरक्षित प्रवासाची खात्री देणाऱ्या एसटी महामंडळात सलग पाच ते पंचवीस वर्षे विनाअपघात सेवा बजावलेल्या एसटी चालकांचा सपत्नीक सत्कार विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. विभागीय कार्यालयात हा सत्कार झाला.
एका दिवसात लाखो प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाची बससेवा तत्पर आहे. गर्दीतून, अरूंद रस्त्यावरून, महामार्गावरून तसेच घाटमाथ्यावरून अशा अनेक अवघड कोंडीतून सुरक्षितपणे एसटी चालविण्याचे काम चालक करतात. एका वेळी पन्नास प्रवाशांनी भरलेली बस विविध अडथळे ओलांडून इच्छितस्थळी सुरक्षित प्रवास घडविण्यात या चालकांचा मोलाचा वाटा असतो. अशा चालकांना शाबासकीची थाप म्हणून प्रत्येक आगारातील विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांचे दरवर्षी सत्कार होतात. यंदाही विभाग नियंत्रक श्रीमती बारटक्के यांच्या हस्ते असे सत्कार झाले.
एसटी चालवताना सलग २५ वर्षे विनाअपघात सेवा दिल्याबद्दल जयकुमार माळगे (कोल्हापूर), शशिकांत बरकाळे, शिवाजी पाटील (गारगोटी), अशोक मर्णहोळकर (चंदगड), निशिकांत साठे (कुरूंदवाड), विद्यानंद घोरपडे (कागल), तानाजी पाटील, सदाशिव सुतार, श्रीकांत पोवार (राधानगरी) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एसटीच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
संभाजीनगर एसटी आगारातील वाहक अमोल आळवेकर हे गिर्यारोहक आहेत. एसटी महामंडळात सेवा बजावून ते गिर्यारोहणाचा छंदही जोपासतात. त्यांनी हिमालयातील १९ हजार ६२६ फूट उंचीचे हनुमान तिब्बा शिखर नुकतेच सर केले. तसेच संताराम जाधव यांना कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्कार लाभल्याबद्दल या दोन्ही कर्मचाऱ्यांचे बारटक्के यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गोपालदासपूर येथील 500 वर्ष जुन्या राखल राजा मंदिरात पोयला बैशाखची प्रार्थना करण्यासाठी भाविक दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT