कोल्हापूर

चला, वाहतूक सुरळीत करूया

CD

लोगो-यिन

चला, सारे मिळून लक्ष्मीपुरीतून देवू रोल मॉडेल
फोर्ड कॉर्नर ते आईसाहेब महाराज पुतळा मार्ग सुरक्षित वाहतुकीसाठीचा आदर्श बनणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : नवरात्रोत्सव म्हणजे आदिमायेचा जागर. हा जागर मांडताना नऊ दिवस यंदा कोल्हापूरकर शहर वाहतूक सुरळीत ठेवण्याचा निर्धार करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासन आणि लोकसहभागातून लक्ष्मीपुरीतील सतत गजबजलेला फोर्ड कॉर्नर ते आईसाहेब महाराज पुतळा हा मार्ग रोल मॉडेल बनवला जाणार आहे. येथे आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जाणार असून, या रोल मॉडेलमधून प्रेरणा घेवून सर्व शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

कोल्हापूर शहरात गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या वाढली असून, प्रमुख मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यामुळे बऱ्याचदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या पार्श्‍वभूमीवर प्रबोधन आणि कृतीशील उपक्रमांची सांगड घालत शहर वाहतूक कोंडीमुक्त करता येणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा राहणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी कृतीशील उपक्रम राबवले जाणार आहेत. या माध्यमातून वाहनधारकांबरोबरच सर्वच घटकांसाठी प्रबोधन मोहिमही होणार आहे. सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या व्यासपीठासह शहर वाहतूक शाखेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये समाजातील विविध सेवाभावी संस्था, संघटनाही आता स्वयंस्फूर्तपणे सहभागी होवू लागल्या आहेत.
--------------
चौकट
प्रत्येकाने ही जबाबदारी घेवूया...
- वाहतूकीचे सर्व नियम पाळूया
- सिग्नलला गाडी थांबवताना
झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडे थांबवूया
- हिरवा सिग्नल मिळेपर्यंत वाहने बंद ठेवूया,
कार्बनचे उत्सर्जन कमी करूया
- रस्त्याच्या कडेला मारलेल्या पट्ट्यांच्या
आतच वाहनांचे पार्किंग करूया
---------
चौकट
दृष्टीक्षेपात मोहीम...
- वाहतूक नियम पाळण्याबाबतचे होणार प्रबोधन
- ध्वनी, वायू प्रदूषण रोखण्याचे आवाहनही होणार
- सर्वांनी मिळून कोल्हापूर प्रदूषणमुक्त व वाहतूकीचे
नियम पाळणारे शहर अशी ओळख बनवण्याचे ध्येय
- प्रत्येकाने स्वतःपासून सुरवात करण्याचे आवाहन
- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही होणार जनजागृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT