कोल्हापूर

श्रेष्ठी मैदानावर प्रेक्षक गॅलरी उभारणीची कांबळेंची मागणी

CD

श्रेष्ठी मैदानावर प्रेक्षक गॅलरी
उभारणीची कांबळेंची मागणी
पालिका मुख्याधिकारी खारगे यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ः संकेश्‍वर रोडवरील भीमनगर परिसरात असलेल्या म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर प्रेक्षक गॅलरी आणि ओपन जीमची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी नगरसेविका रेश्मा कांबळे यांनी केली आहे.
याबाबत मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, परिसरातील भीमनगरसह संकेश्‍वर रोडवरील अनेक वसाहतीमधील मुले-मुली, युवकांना खेळासाठी आणि ज्येष्ठांना व्यायामासाठी एकमेव मैदान आहे. याठिकाणी रोज सरावासाठी खेळाडूंची गर्दी होत असते. तसेच विविध स्पर्धाही येथे घेण्यात येतात. अनेक सांस्कृतिक स्पर्धाही होत असतात. तेव्हा याठिकाणी प्रेक्षक गॅलरीची सोय आवश्यक आहे. तसेच शालेय मुले, ज्येष्ठांसाठी ओपन जीमची सुविधाही द्यावी. या प्रभागातील नागरिकांना मुबलक नागरी सुविधा देण्यासाठी निधी देण्याची मागणी आहे.
दरम्यान, कांबळे यांनी दलित वस्तीमध्ये येणाऱ्या या प्रभागात भीमनगर बारामती चौक, पाटणे चौक, हारूण सय्यद घरासमोर भीम सरकार चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, दुंडगा मार्गावर यमगेकर यांच्या घरासमोर आणि म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाजवळ सोलर हायमास्ट दिवे बसविण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनातून सुचविले असून वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ही कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT