कोल्हापूर

निधन वृत्त

CD

47930
मोरेश्वर फडके यांचे निधन
कोल्हापूर, ता. २९ ः येथील फडके प्रकाशन संस्थेचे संस्थापक मोरेश्वर विश्वनाथ फडके (वय ७७) यांचे निधन झाले. दुधाळी हरी मंदिर परिसरातील त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा निघाली. पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. श्री. फडके पन्नासहून अधिक वर्षे प्रकाशन क्षेत्रात कार्यरत होते. शिवाजी विद्यापीठासह राज्यातील विविध विद्यापीठांतील अभ्यासक्रमांबरोबरच स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके त्यांच्या मार्गदर्शनाखाली फडके प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

47935
भागूबाई मालवेकर
कोल्हापूर ः सावर्डे खुर्द (ता. कागल) येथील भागूबाई शंकर मालवेकर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

47971
निर्मला चव्हाण-जामदार
कोल्हापूर ः येथील निर्मला विलासराव चव्हाण-जामदार (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, मुली व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

47979
सोनाबाई मायनवर
कोल्हापूर ः सांगाव (ता. कागल) येथील सोनाबाई पुंडलिक मायनवर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

47909
अंजना कारंडे
कोल्हापूर ः जवाहरनगर येथील अंजना राजेंद्र कारंडे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून व नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

47910
सुरेश भोसले
कोल्हापूर ः चंबुखडी येथील सुरेश गोविंद भोसले (वय ४६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

03467
शिवाजी मांडे
गारगोटी : मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथील शिवाजी रामचंद्र मांडे (वय ५९) यांचे निधन झाले. मुली, मुलगा, सून असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते संभाजी मांडे यांचे ते भाऊ होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

47908
आक्काताई आरंडे
कोल्हापूर ः ताराबाई रोड येथील आक्काताई गोविंद आरंडे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

47980
जयसिंग भोसले
कोल्हापूर : शिवाजी पेठ संध्यामठ गल्लीतील जयसिंग तुकाराम भोसले (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

01147
बंडेराव भोईटे
कडगाव : दिंडेवाडी (ता. भुदरगड) येथील बंडेराव ईश्वरा भोईटे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) मुंबईत आहे.

02685
आनंदराव चव्हाण
हुपरी : येथील आनंदराव दादू चव्हाण (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९)आहे.

47983
बबन भोसले
कोल्हापूर : अंबाई कॉलनी कोडोलीतील बबन आनंदा भोसले (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

00332
बापू पाटील
माजगाव : यवलूज (ता. पन्हाळा) येथील बापू बाळा पाटील (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

chd284.jpg
दत्ताराम पेडणेकर
चंदगड ः उमगाव (ता.चंदगड) येथील दत्ताराम लुमाजी पेडणेकर (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

01981
लक्ष्मी पोतदार
सोनाळी : पाचवडे (ता. भुदरगड) येथील लक्ष्मी ज्ञानदेव पोतदार (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

00330
सावित्री शिंदे
माजगाव : खोतवाडी (ता. पन्हाळा) येथील सावित्री आनंदा शिंदे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

gad285.jpg
47937
प्रकाश कदम
गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील प्रकाश महादेव कदम (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

फोटो क्रमांक : gad286.jpg
47938
अभिजीत पाटील
गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील अभिजीत अमृत पाटील (वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १) आहे.

04613
जगन्नाथ बनसोडे ‌
पुनाळ : येथील माजी सैनिक जगन्नाथ लक्षमण बनसोडे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

00967
लक्ष्मीबाई मस्कर
प्रयाग चिखली : रजपूतवाडी (ता. करवीर) येथील लक्ष्मीबाई श्रीपती मस्कर (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) तीर्थक्षेत्र प्रयागला आहे.

01979
सुभाष पाटील
सोनाळी : कुर्डू (ता. करवीर) येथील सुभाष तुकाराम पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

03954
विठ्ठल मोरे
सरवडे : येथील विठ्ठल बळवंत मोरे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

02082
किरण वारके
बिद्री : बोरवडे (ता. कागल) येथील किरण सदाशिव वारके ( वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई , वडील, पत्नी, दोन बहिणी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

13926
रमाबाई भोईटे
कोल्हापूर : शुक्रवार पेठ, फडणीस गल्ली येथील रमाबाई विठ्ठलराव भोईटे (वय ७८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

47984
विनायक बागडी
कोल्हापूर : नांदोली (ता. भुदरगड) येथील विनायक हरी बागडी (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सून व नातवंडे असा परिवार आहे.

03465
भाग्यश्री भुर्के
गारगोटी : येथील भाग्यश्री भालचंद्र भुर्के (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Child Abuse: ऑर्केस्ट्रा, डान्स ग्रुप आणि स्पामध्ये बालकामगारांवर बंदीची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि NHRC ला नोटीस

‘पेद्दी’मधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचे धमाकेदार डान्स नंबर ‘हेल्लाल्लालो’ रिलीज!

Kolhapur Accident : गगनबावड्यात भरधाव ट्रकचा कहर; दुचाकीस्वार ठार, सात वाहनांचे नुकसान व दोन गायींचा मृत्यू

Farmer Endlife : व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT