कोल्हापूर

गडहिंग्लजला शुक्रवारी मोर्चा

CD

गडहिंग्लजला शुक्रवारी मोर्चा
गडहिंग्लज ः गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने येथील प्रांत कार्यालयावर शुक्रवारी (ता. १) मोर्चा काढण्यात येणार आहे. संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने देशपातळीवर हे आंदोलन होणार आहे. दुपारी एक वाजता महालक्ष्मी मंदिरापासून मोर्चाची सुरूवात होणार आहे. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून मोर्चातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष संभाजी मोहिते यांनी केले आहे.
----------------------------------------------
जागृती शिक्षणशास्त्रमध्ये फुले जयंती
गडहिंग्लज ः येथील जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी केली. यानिमित्त फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रंथपाल प्रशांत कोरे यांनी केले. प्रा. एस. बी. मगदूम यांनी फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. आर. बी. पाटील, प्रा. ए. एम. नवले, ए. डी. दड्डी, विकास बुरूड, आदर्श तेली, शिवाप्पा कोचरी आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------
गडहिंग्लज प्रशालेत फुलेंना अभिवादन
गडहिंग्लज ः येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये महात्मा फुले यांना अभिवादन केले. मुख्याध्यापक पंडीत पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम झाला. पर्यवेक्षक सुनिल कांबळे अध्यक्षस्थानी होते. सौ. व्ही. ए. देसाई यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. सौ. एस. एस. देसाई, सौ. ए. ए. नाईक, सौ. ताशिलदार, सौ. पी. यू. पाटील आदी उपस्थित होते. प्रियंका शिंदे व व्ही. ए. देसाई यांची भाषणे झाली. वैजनाथ पालेकर यांनी सूत्रसंचालन केले.
-------------------------------------------------------
घाळी कॉलेजमध्ये फुलेंचा स्मृतीदिन
गडहिंग्लज ः येथील डॉ. घाळी महाविद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रा. राजश्री पोरे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. संस्थेचे सहसचिव प्रा. गजेंद्र बंदी यांचे भाषण झाले. प्राचार्य डॉ. शिवानंद मस्ती, डॉ. दत्ता पाटील, डॉ. नागेश मासाळ, डॉ. सरला आरबोळे, डॉ. शशिकांत संघराज, कार्यालय अधीक्षक हरिभाऊ पन्हाळकर, डॉ. सरोज बीडकर, प्रा. तेजश्री कानकेकर आदी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. महेश कदम यांनी स्वागत केले.
-----------------------------------------------------
GAD283.JPG
47917
गडहिंग्लज ः बसवेश्वर पुतळा येथे दिपोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी श्री बसवकिरण महास्वामी, सुरेश कोळकी, राजेंद्र तारळे, राजशेखर दड्डी, बाळासाहेब घुगरे आदी उपस्थित होते.

गडहिंग्लज बसवेश्वर पुतळ्याजवळ दीपोत्सव
गडहिंग्लज ः येथील महात्मा बसवेश्वर पुतळा येथे लिंगायत समाज बांधवांकडून त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दीपोत्सव साजरा केला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी कार्तिक महिन्यात दीपावली आणी त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा येथे दीपोत्सव साजरा केला. जडेयसिद्धेश्वर आश्रम बेलबागचे बसवकिरण स्वामी यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम झाला. सुरेश कोळकी, राजेंद्र तारळे, राजशेखर दड्डी, सुरेश घुगरे, बाळासाहेब घुगरे, दयानंद पाटील, बसवराज आजरी, महेश आरभावी, जितेंद्र नाईक, महादेव मुसळे, प्रवीण मेणशी, सचिन घुगरे, विकास रामणकट्टी, किरण कापसे, रावसाहेब मुरगी, सचिन पाटील, मनीष कोले उपस्थित होते.
--------------------------------------------------------
GAD284.JPG
47918
गडहिंग्लज ः मुंबई हल्ल्यातील शहिदांना मशाल रॅलीद्वारे अभिवादन केले. यावेळी अकलाख मुजावर, राम पाटील, रियाज शमनजी, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.

गडहिंग्लजला शहिदांना अभिवादन
गडहिंग्लज ः मुंबईतील २६-११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्यावतीने मशाल रॅली काढून अभिवादन केले. भगवा चौकापासून निघालेली मशाल रॅली दसरा चौकातील छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ आली. येथे शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलिस निरिक्षक गजानन सरगर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष राम कुंभार, तालुकाध्यक्ष नंदकुमार निळकंठ, उपाध्यक्ष श्रीकांत सुतार, संपर्क प्रमुख सचिन लोहार, विजय टिपुगडे, मिनाताई टिपुगडे, रियाज शमनजी, अकलाख मुजावर, रवी पाटोळे, नागेश चौगुले, कमलाकर क्षीरसागर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

Latest Marathi News Live Update : ट्रॅव्हल्समधील १९ लाखांच्या दागिन्यांची चोरी उघड

SCROLL FOR NEXT