कोल्हापूर

खेळाडूंची थेट नियुक्ती

CD

थेट नियुक्तीसाठी किती दिवस ‘वेट’

राज्यातील १२१ खेळाडूंवर शासनाची वक्रदृष्टी
-----
कौतुक नको, तर नोकरी द्या
राज्यातील १२१ खेळाडूंची उद्वेगपूर्ण भावना : थेट नियुक्तीसाठी ‘वेटिंग’च
------------

राज्यातील १२१ खेळाडूंचे थेट नियुक्तीसाठी ‘वेटिंग’
शासनाची वक्रदृष्टी : कौतुक नको, तर नोकरी द्या, मागणीला जोर

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : राज्यातील सर्वसाधारण ९६ व दिव्यांग २५ खेळाडू थेट नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य शासनाच्या वक्रदृष्टीचा काळ संपत नसल्याने हताश होण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून ‘कौतुक नको, तर नोकरी द्या,’ या आशेवर ते दिवस ढकलत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविलेल्या खेळाडूंना शासकीय सेवेत जाण्याचा सोपा मार्ग खुला आहे. बेरोजगारीचा मुद्दा कळीचा बनल्याने कधी एकदा नोकरी मिळते, ही त्यांची भावना आहे. त्याकरिता त्यांनी क्रीडा संचालनालयाला प्रस्तावही पाठवले आहेत. त्यावरील कार्यवाही धीम्या गतीने सुरू असल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर व्यक्त होणे स्वाभाविक आहे. त्याची दखल मात्र कोणी घ्यायला तयार नाही. २०१८ नंतर पाठविलेल्या प्रस्तावांची संख्या १२१ आहेत. २०२३ संपत आले, तरी त्यावर कोणताच निर्णय झाला नसल्याचे चित्र आहे. नेमबाजीतील नऊ व जलतरणमधील एक खेळाडू शासकीय सेवेत रूजू आहेत. तलवारबाजीचे प्रशिक्षक विनय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तलवारबाजी क्रीडा प्रकारातून थेट नियुक्तीसाठी एकाही खेळाडूने प्रस्ताव पाठविलेला नाही.

चौकट
शासन निर्णय ३० एप्रिल २००५ चा...
राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत ३० एप्रिल २००५ ला शासन निर्णय झाला. शासकीय व निमशासकीय सेवेत खेळाडूंसाठी पाच टक्के समांतर खेळाडू आरक्षण ठेवले. त्यात ९ डिसेंबर २०१० व १० एप्रिल २०१३ मध्ये दुरूस्ती करण्यात आली. गट ‘अ’मधील नियुक्तीसाठी ऑलिंपिक, जागतिक, एशियन व कॉमनवेल्थ, ‘ब’, ‘क’, ‘ड’ गटाकरिता आशियाई चॅम्पियनशिप, ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप, यूथ ऑलिंपिक स्पर्धेतील पदक विजेते पात्र ठरविले. तसेच स्पर्धेनंतर संबंधित खेळाडूने सहा महिन्यात थेट नियुक्तीसाठी अर्ज करणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


चौकट
* गट ‘अ’ ग्राह्य क्रीडा प्रकार
- धनुर्विद्या, ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, सायकलिंग, अश्‍वारोहण, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, ज्युदो, कयाकिंग ॲंड कनोईंग, कबड्डी, नेमबाजी, रोईंग, जलतरण (डायव्हिंग व वॉटर पोलोसह), टेबल-टेनिस, तायक्वॉंदो, टेनिस, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बुद्धिबळ, क्रिकेट, खो-खो.
* गट ‘अ’मधील वरील क्रीडा प्रकारांसह गट ‘ब’, ‘क’, ‘ड’साठी बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, सेलिंग, स्क्वॅश, याटिंगचा समावेश.

कोट
रेश्‍माने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. तिची थेट नियुक्ती व्हावी, यासाठी सहा महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठवला आहे. तिला कधी नोकरी मिळते, याच्या प्रतीक्षेत आहोत.
- अनिल माने, कुस्तीपटू रेश्‍मा माने हिचे वडील, वडणगे
---
(जिल्हा क्रीडा कार्यालयाने २०२१ ला
संकलित केलेल्या माहितीनुसार)

ग्राफ
दृष्टिक्षेपात जिल्हा...
आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू- ७५
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू- १६५४
नेमबाजीतील खेळाडू (सर्वाधिक)- २२
नेमबाजीमधील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू- १०००
आंतरराष्ट्रीय स्तरावरील तलवारबाजीतील खेळाडू- १६
जलतरणमधील खेळाडू- १२
तायक्वॉंदोमधील खेळाडू- १०
फुटबॉलमधील खेळाडू- ७
कुस्तीमधील खेळाडू ४
योगामधील खेळाडू- ३
ज्युदोमधील खेळाडू- १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेल्वे गाड्यांना उशीर, परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक; रेल्वेची तोडफोड, IGसह पोलीस जखमी

IND vs AFG: थांबा आईचा कॉल येतोय... नितीश रेड्डीचा पत्रकार परिषद सुरू असतानाच वाजला फोन अन् मग...; पाहा Video

Gurupushyamrit Yoga Significance : गुरुपुष्यामृत योगातून त्रिवेणी संगमाच्या आध्यात्मिक अर्थाचा उलगडा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 जून 2026

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ जून २०२६ ते २० जून २०२६)

SCROLL FOR NEXT