gad35.jpg :
68829
प्रतीक्षा येसादे
--------------------------
प्रतीक्षाने घातली दुहेरी यशाला गवसनी
सहायक अभियंतापदी निवड : महिन्यात बांधकाम व पाटबंधारे विभागाच्या परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : स्पर्धा परीक्षेतून यश मिळवायचे असेल तर संयम हेच मोठे शस्त्र आहे. संयम असेल तरच अपयश, दु:ख यापलिकडे जाऊन अभ्यास नीट करता येतो आणि उशिरा का असेना यश मिळते. याचा वस्तुपाठ घालून दिला आहे, येथील प्रतीक्षा रमेश येसादे या तरुणीने. नुकत्याच झालेल्या सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागाच्या परीक्षेतून सहायक अभियंता पदाला तिने गवसनी घातली आहे. एका महिन्यात तिने दुहेरी यश मिळविले, हे विशेष.
प्रतीक्षा इंजिनीअरिंग करत असताना तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. कुटुंबावर हा आघात झाल्यानंतर घरात सर्वात मोठी म्हणून दु:ख गिळून सर्वांना सावरण्याची जबाबदारी तिच्यावर आली. आपली मुलगी प्रशासकीय अधिकारी व्हावी हे स्वप्न रमेश येसादे यांनी पाहिले होते. या स्वप्नाचा पाठलाग करायचा निश्चय प्रतीक्षाने केला. पुढच्याच वर्षी ती इंजिनिअरिंग परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिने स्थापत्य अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
दरम्यान, कोरोनात परीक्षांना ब्रेक लागला. पण, प्रतीक्षाने संयम ढळू दिला नाही. कोरोनाचे संकट काहीसे दूर झाल्यानंतर परीक्षा सुरू झाल्या. मात्र, त्याचे निकाल लवकर लागत नव्हते. प्रतीक्षा पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उतीर्ण झाली. त्यामुळे काहीसा आत्मविश्वास आला. मात्र, काही सरळसेवा परीक्षांमध्ये तिला यश आले नाही. या अपयशाने खचून न जाता पुन्हा अभ्यास सुरू केला. यश जवळ आले होते. मात्र, हुलकावणी देत होते अशी काहिशी अवस्था प्रतीक्षाची झाली होती.
पण, अभ्यासातील सातत्य, चुकांची दुरुस्ती आणि आत्मविश्वास या बळावर तिने सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा उतीर्ण होत असिस्टंट इंजिनीअर पद मिळवले. त्यानंतर आज जाहीर झालेल्या पाटबंधारे विभागाच्या परीक्षेत उतीर्ण होत पुन्हा असिस्टंट इंजिनीअरपद पटकावले. प्रतीक्षाने मिळविलेल्या या दुहेरी यशाचे कौतुक होत आहे.
-------------
मी प्रशासकीय सेवेत जावे हे माझ्या दिवंगत वडिलांचे स्वप्न होते. ते काही अंशी मी पूर्ण केले याचा आनंद आहे. अभ्यासातील सातत्य आणि आत्मविश्वास या जोरावर मी परीक्षा उतीर्ण झाले. हे यश अंतिम नाही याचीही मला जाणीव आहे.
- प्रतीक्षा येसादे, गडहिंग्लज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.