68853
...
मार्केटींग फेडरेशनसाठी ९९ टक्के मतदान
उद्या मतमोजणी ः कोल्हापूर जिल्ह्यातील ७२ पैकी ७१ मतदान
सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. ३ ः मंत्री, खासदार, आमदार सभासद असलेल्या आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या महाराष्ट्र राज्य पणन महासंघ तथा मार्केटींग फेडरेशनसाठी आज राज्यभर चुरशीने ९९ टक्के मतदान झाले. एकूण ५७९ मतदारांपैकी ५७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता.५) पुणे येथे होणार आहे.
फेडरेशनच्या संचालक पदाच्या १९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी १३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित सहा जागांसाठी आज पुणे, कोल्हापूरसह राज्याच्या विविध विभागीय कार्यालयात मतदान झाले. कोल्हापूर व सांगलीचे मतदान येथील उद्योग भवनमध्ये तर सातारा व पुणे जिल्ह्याचे मतदान पुणे येथील साखर संघाच्या कार्यालयात झाले. पुणे विभागातून दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत, त्यात शिवाजीराव काकडे (बारामती) व संदीप नरके (कोल्हापूर) यांचा समावेश आहे. महिला गटातून महायुतीकडून कागल तालुक्यातील धनश्री धनराज घाटगे रिंगणात आहेत.
एकूण ५७९ ठरावदारांपैकी पुणे विभागात १३९ मतदार आहेत. त्यात कोल्हापुरातील ७२, पुणे २०, सोलापूर २२, सांगलीतील १२ मतदारांचा समावेश आहे. कोल्हापुरातून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, राजेश पाटील, अरूण नरके, माजी आमदार संजय घाटगे, अमल महाडिक, ‘शाहू’ चे समरजितसिंह घाटगे, गणपतराव पाटील, डॉ.चेतन नरके, धनाजीराव देसाई यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. पुणे जिल्ह्यात शंभर टक्के तर सोलापूरमध्ये २२ पैकी २१ मतदारांनी हक्क बजावला. पुणे विभागात एकूण १३९ पैकी १३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
...
दृष्टिक्षेपात मतदान
पुणे विभाग ः १३९ पैकी १३७
कोल्हापूर जिल्हा ः ७२ पैकी ७१
नाशिक विभाग ः ८६ पैकी ७८
कोकण विभाग ः ५७ पैकी ५६
...............
खासदार मंडलिक अनुपस्थित
कोल्हापूर जिल्ह्यातील ७२ मतदारांत बहुंताशी आमदार, माजी आमदार, खासदार व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा मतदार म्हणून समावेश आहे. यापैकी ७१ जणांनी मतदान केले, पण खासदार प्रा. संजय मंडलिक हे मात्र मतदानापासून वंचित राहीले. सांगलीतील युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी कोल्हापुरात मतदानाचा हक्क बजावला.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.