

Student Protest Victory Uddhav Thackeray Criticizes BJP Says Government Yielded to Peoples Movement
sakal
मुंबई : भाजपविरोधातील संघर्षाची ही केवळ सुरुवात असून हा लढा देशाच्या भवितव्यासाठी आहे, असा सरकारवर हल्लाबोल करत शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्क परिसरात आयोजित तिरंगा विजय जल्लोष सभेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक केले. ‘कोणतीही निवडणूक जिंकलेलो नाही, मात्र अंधभक्तांविरुद्धच्या लढाईत देशभक्तांचा विजय झाला आहे. एका ‘झुरळा’ने हुकूमशाहाला नमवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तरी राजकारणातून वेळ काढून देशाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे,’ असा टोलाही ठाकरे यांनी मोदी यांना हाणला.