‘केएमटी’वर अनधिकृत जाहिरात
करणाऱ्यांवर कारवाई कराः जाधव
बसस्थानकाला अचानक भेट देऊन केली पाहणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : ‘केएमटी’च्या कंदलगाव बसवर अनधिकृतरित्या जाहिरात प्रदर्शित करणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी आज येथे संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अशा पद्धतीने अनधिकृतरित्या बसेसवर जाहिरात करणाऱ्यांची तपासणी करुन दंड वसुल करावा, असेही त्यांनी सांगितले.
जाधव यांनी आज सकाळी ७.३० वाजता अचानक मध्यवर्ती बसस्थानक येथील के. एम. टी. बस नियंत्रण केंद्राला भेट दिली. येथे इस्पुर्ली, हळदी-बाचणी या मार्गावरील दोन बसेस दीर्घकाळ प्रतीक्षेत होत्या. या मार्गावर दैनंदिन होणाऱ्या फेऱ्या आणि चालक-वाहकांकडून आवश्यक काम पूर्ण होते का? याबाबत त्यांनी माहिती घेतली. प्रवाशांना बसेसच्या वेळा आणि मार्गाबाबत माहितीची उद्घोषणा करणारे कर्मचारी वाहक साबळे यांचेकडे या रुट नियोजनाबाबत चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. स्वतंत्र कर्मचाऱ्यासह दीर्घकाळ थांबून राहणाऱ्या बसेसचे नियोजन करावे, असे निर्देश जाधव यांनी वाहतूक निरिक्षकांना दिले.
सहाय्यक वाहतूक निरिक्षक यांच्या व्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा बसेसना अचानक भेट देऊन तपासणी करावी, अशा सूचना जाधव यांनी दिल्या.
चौकट
कंदलगाव बसमधून केला प्रवास
मध्यवर्ती बसस्थानक येथून कंदलगावकडे जाणाऱ्या बसमधून जाधव यांनी स्वत: प्रवास करुन माहिती घेतली. प्रवाशांच्या कमी संख्येबाबत वाहक पठाण यांच्याकडे विचारणा केली. यावर रविवारी सुटी असल्याने प्रवाशांची संख्या कमी असल्याचे उत्तर पठाण यांनी दिले. विनातिकीट प्रवास करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला तिकिट घेण्यास भाग पाडल्याबद्दल पठाण यांचे जाधव यांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.