07276
आर. के. नगर : रिंगरोडवर शेंडापार्क हद्दीत टाकलेला कचरा.
आणखी किती वेळा
झाडांचा जीव घ्यायचा?
हद्दीवरील जैववैद्यकीय कचऱ्यानेच शेंडा पार्कात आग
प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. ३ : आर. के. नगर रिंगरोडवर व शेंडापार्क हद्दीवर किमान चार ठिकाणी कचरा कोंडाळे आहेत. त्यातही येथे जैववैद्यकीय कचरा फेकून पेटविला जातो. त्यामुळेच येथे वारंवार आगीचे प्रकार घडत असल्याच्या संतप्त भावना परिसरातून व्यक्त होत आहेत. आणखी किती वेळा झाडांचा जीव घ्यायचा? येथे कचरा टाकणाऱ्यांवर आणि पेटवणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
आगीचे प्रकार एक दोन वेळा नाहीतर दहा वेळा घडले आहेत. या हद्दीवरील कचऱ्यामध्ये जैववैद्यकीय व प्लास्टिकचा कचरा जादा असल्याने तो पेटविल्यास त्याची आग आठवडाभर धुमसत असते. मुळातच कचरा न पेटविता तो योग्य ठिकाणी साठविणे व घंटागाडीत टाकणे आवश्यक आहे. मात्र, अनेकदा सुशिक्षित व नोकरदारांकडून जाता-जाता रस्त्यावर कचऱ्याच्या पिशव्या टाकल्या जातात. अशा लोकांवरही नजर ठेवून कारवाई व्हावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
चौकट
कचरा पेटवून समाजसेवेचा आव...
पाचगाव व मोरेवाडी हद्दीलगत हा शेंडापार्क परिसर असून, स्थानिक व काही प्रवासी नागरिकांकडून या हद्दीवर कचरा टाकण्यात येतो. हा कचरा रस्त्यावर व परिसरात पसरू नये, यासाठी काही स्वयंघोषित समाजसेवक अनेकदा कचरा पेटवून आपण समाजसेवक असल्याचा आव आणतात.
चौकट
जैववैद्यकीय कचऱ्याचे ढीगच्या ढीग
रिंगरोड व आर. के.नगरमध्ये दवाखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जैववैद्यकीय कचऱ्याचे ठिकठिकाणी ढीग असतात. अनेकदा यामध्ये सुया, रिकाम्या काचेच्या बॉटल, सलाईन पाईप असे साहित्य असते. हा कचरा नेमका कोण आणून टाकते, याबाबतही कार्यवाही होणे आवश्यक आहे.
चौकट
शिवसेनेचा आज हल्लाबोल
शेंडापार्क वनीकरण विभागाला वारंवार लागणाऱ्या आगीच्या संदर्भात कृषी महाविद्यालयाकडून उपाययोजना होत नसल्याने शिवसेनेच्या वतीने कृषी महाविद्यालयावर उद्या (सोमवारी) हल्लाबोल आंदोलन होणार आहे.
कोट
07275
हद्दीवर जैववैद्यकीय व इतर कचरा टाकत असल्याचे दिसल्यास नागरिकांतून अटकाव व्हावा. यातूनही कचरा पडत असेल तर संबंधित ग्रामपंचायतीने कारवाई करावी.
- महेश शेटे, वृक्षप्रेमी.
कोट
07274
मोरेवाडीच्या संपूर्ण हद्दीमध्ये कचरा गाडी फिरत असते. नागरिकांनी इतरत्र कचरा न टाकता घंटागाडीचा वापर करावा. कचरा पेटविताना आढळल्यास ग्रामपंचायतीने कारवाई करावी.
-विराज पाटील, शिवसेना, करवीर तालुकाप्रमुख.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.