कोल्हापूर

बातमी

CD

68931
कोल्हापूर : जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बी. अग्रवाल यांचे स्वागत करताना डॉ. विश्वनाथ मगदूम. शेजारी अन्य मान्यवर.

कायद्याचा अभ्यास चिकित्सक पद्धतीने करा
कविता अग्रवाल : शहाजी लॉ कॉलेजमध्ये अभिरूप न्यायालय स्पर्धा

कोल्हापूर, ता. ३ : विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी चिकित्सक पद्धतीने कायद्याचा अभ्यास करावा, असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बी. अग्रवाल यांनी व्यक्त केले. येथील शहाजी लॉ कॉलेजमध्ये आयोजित आंतरविद्यापीठ अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
कौन्सिल ऑफ एज्युशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम अध्यक्षस्थानी होते.
जिल्हा न्यायाधीश शैलेंद्र शं. तांबे यांनी स्पर्धेच्या युगात परिश्रमाला पर्याय नसल्याचे नमूद केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील यांनी शिकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवा, असे सांगितले.
डॉ. मगदूम म्हणाले, ‘महाविद्यालय ९० वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नेहमीच प्रोत्‍साहन दिले आहे.’
प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांनी प्रास्ताविक केले. अभिरूप न्यायालय स्पर्धेचे समन्वयक प्रा. डॉ. एम. सी. शेख यांनी आभार मानले. डॉ. सविता रासम, डॉ. सुहास पत्की, डॉ. अतुल जाधव, डॉ. अस्मिता पाटील, डॉ. सुचिता सुरगीहळ्ळी यांनी संयोजन केले. प्रा. शिवभूषण जाधव यांनी तांत्रिक सहाय्य केले.

विजेते असे
प्रथम क्रमांक - शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर, द्वितीय क्रमांक - भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली, उत्कृष्ट वक्ता : संतोष कारे, फलटण लॉ कॉलेज फलटण, न्यायाधीश यांचे विशेष कौतुक पारितोषिक : साक्षी कोठावळे आय. एम. लॉ कॉलेज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Playing XI: रजत पाटीदार कर्णधार, सरफराज-ऋतुराज गायकवाड संघात; सोशल मीडियावरील Playing XI मुळे खळबळ

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

Latest Live Updates Marathi : 'पॅलेट गन चालवण्याचा आदेश कुणी दिला? गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं'; प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

पुण्यात खळबळ! विद्यापीठात बनावट डिग्रीचं रॅकेट? रिक्षाचालकाने उघड केलं गंभीर प्रकरण

SCROLL FOR NEXT