Trunk Call The Wildlife Foundation esakal
कोल्हापूर

'ट्रंक कॉल फाउंडेशन'च्या कामाची ब्रिटिश संसदेत दखल; हत्तींशी सुसंवाद साधणाऱ्या माणसाचं तोंडभरून कौतुक, काय आहे प्रकार?

हत्तींकडून शेतशिवारातील पिकांचे केले जाणारे नुकसान, मालमत्तेची हानी, माणसांचे बळी यामुळे हत्ती विरुध्द मानव असा संघर्ष पेटला.

सुनील कोंडुसकर

भारत आणि ब्रिटन यांच्यात समन्वय साधणाऱ्या ‘लिव्‍हिंग ब्रिज’ या मासिकात ‘ट्रंक कॉल फाउंडेशन’च्या कामाचे वृत्तांकन छापण्यात आले. ब्रिटिश संसदेत त्यावर चर्चा झाली.

चंदगड : हत्तींशी (Elephant) सुसंवाद साधणारा माणूस म्हणून जागतिक पटलावर नावलौकिक मिळवलेल्या आनंद शिंदे यांच्या कामाची ब्रिटिश संसदेने (British Parliament) दखल घेतली. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लंडन येथे ब्रिटिश संसदेत झालेल्या कार्यक्रमात शिंदे व त्यांच्या ‘ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशन’च्या (Trunk Call The Wildlife Foundation) सहकाऱ्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले.

चंदगड (जि. कोल्हापूर) विभागात गेली दीड वर्षे जंगली हत्ती आणि मानवी संबंध सुधारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि तत्पूर्वी विविध राज्यांमध्ये हत्ती संदर्भात केलेल्या कामांची ही पोचपावतीच आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी हत्तीचे महाराष्ट्राच्या हद्दीत आगमन झाले ते चंदगड (Chandgad) तालुक्यातून. सुरुवातीच्या काळात कर्नाटक हद्दीलगत वावरणाऱ्या हत्तीने पुढे राधानगरीपर्यंतचा परीघ व्यापला.

चंदगड व आजरा तालुक्यांत काही हत्तींनी कायमचे वास्तव्‍य केले. हत्तींकडून शेतशिवारातील पिकांचे केले जाणारे नुकसान, मालमत्तेची हानी, माणसांचे बळी यामुळे हत्ती विरुध्द मानव असा संघर्ष पेटला. नागरिकांनी वनविभागाला टार्गेट केले. त्यानंतर वनविभागाकडून हत्तींना हुसकावण्याची मोहीम राबविण्यात आली. जंगलाला चर मारण्यात आली. हाकारा पथके पाचारण करून चोवीस तास त्यांच्यावर निगराणी ठेवण्याचे काम आजही सुरू आहे; परंतु यातून प्रश्न निकाली निघण्याऐवजी परिस्थिती चिघळत गेली. त्याला पर्याय म्हणून आनंद शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली.

पिसाळलेल्या हत्तीला शांत करणे, माजावर आलेल्या हत्तीला योग्य ठिकाणी पोहोचवणे यासारखी अत्यंत कठीण कामे त्यांनी सहजपणे केली होती. त्यासाठी त्यांची अभ्यासपूर्ण निरीक्षणे महत्त्‍वपूर्ण ठरली. याच विश्वासाने शासनाने त्यांच्यावर चंदगड विभागातील हत्तींची जबाबदारी सोपविली. ती त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. फटाके न फोडता केवळ संवादाच्या माध्यमातून त्यांनी हे काम केले. त्याचवेळी गावागावांत जाऊन नागरिकांशी व शाळेतील मुलांशी संवाद साधला. त्यांना हत्ती, माणूस आणि पर्यावरण यांचा संबंध समजावून सांगितला. उन्हाळ्यात हत्तींच्या चाऱ्याची सोय म्हणून जंगलात चारा व वृक्षारोपण केले. त्यांचे हे काम जागतिकस्तरावर दखलपात्र ठरले.

विचारांपलीकडचे काम

भारत आणि ब्रिटन यांच्यात समन्वय साधणाऱ्या ‘लिव्‍हिंग ब्रिज’ या मासिकात ‘ट्रंक कॉल फाउंडेशन’च्या कामाचे वृत्तांकन छापण्यात आले. ब्रिटिश संसदेत त्यावर चर्चा झाली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ‘विचारापलीकडचे काम’ अशा शब्दांत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

‘वन्य प्राणी प्रामाणिकपणे निसर्ग नियम पाळतात. त्यांना अत्यंत संवेदनशीलपणे समजून घ्यायला हवे. मित्रत्वाच्या जिव्हाळ्यातून नाते जोडल्यास ते तुमच्याशी समरस होतात. मी व माझ्या सहकाऱ्यांनी प्राण्यांशी जोडलेले ऋणानुबंध जेवढे नाजूक आहेत तेवढेच ते घट्ट आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून या कामाची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असे मला वाटते.

-आनंद शिंदे, हत्ती अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT