कोल्हापूर

शाहू महाराज

CD

फोटो- 75296

राजर्षींच्या ऋणातून उतराई होण्याची संधी
अभिजित तायशेटे ः गुडाळला शाहू महाराजांच्या प्रचारार्थ सभा

कोल्हापूर, ता. ४ ः राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीच्या धोरणामुळेच जिल्ह्यात हरितक्रांती आणि धवलक्रांती झाली असून, छत्रपती घराण्याच्या ऋणातून उतराई होण्याची संधी म्हणून शाहू छत्रपती महाराजांना मताधिक्याने लोकसभेत पाठवूया, असे आवाहन ‘गोकुळ’चे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित तायशेटे यांनी केले.
गुडाळ (ता. राधानगरी) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक महादेव कोथळकर होते. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना लोकसभेत पाठवणे ही गरज असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
''भोगावती''चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, ''राष्ट्रवादी''चे बी. के. डोंगळे, ‘गोकुळ’चे संचालक आर. के. मोरे, माजी महापौर मधुकर रामाणे, गुडाळेश्वर समूहाचे संस्थापक ए. डी. पाटील, ''भोगावती''चे संचालक अभिजित पाटील, रवींद्र पाटील, सागर धुंदरे, सुशील पाटील-कौलवकर, शिवसेनेचे नेते सुरेश चौगले, पांडुरंग भांदिगरे आदी उपस्थित होते. माजी उपसरपंच प्रकाश मोहिते यांनी आभार मानले.
...................
जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी रिंगणात
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज : निगवे येथे साधला संवाद

कोल्हापूर, ता. ४ ः महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जिल्ह्यात सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी आपली उमेदवारी आहे" असे शाहू छत्रपती यांनी सांगितले.
श्रीमंत शाहू छत्रपती यांनी निगवे दुमाला (ता. करवीर) येथे नागरिकांशी संवाद साधला. दिलीपसिंह चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली.
रणजितसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण यांनी श्रीमंत शाहू महाराज यांचे स्वागत केले. ‘गोकुळ’चे संचालक बाबासाहेब चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, बाजीराव पाटील, राजाराम कासार, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, आंबेवाडीचे सिकंदर मुजावर, शिये ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रभाकर काशीद, चंद्रकांत पाटील, निगवे दुमालाच्या सरपंच रूपाली पाटील, उपसरपंच संकेत बामकर, जयहिंद सोसायटीचे अध्यक्ष बाळासो शिरोळकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बत्तास एकशिंगे, देवस्थानचे सुरेश पाटील, प्रकाश पाटील, हंबीरराव वळके, पाणीपुरवठाचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, डॉ. किडगावकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

Latest Marathi News Updates: राऊतांचं स्कील भल्या भल्यांना आत्मसात करता येणार नाही - आव्हाड

Tata Power: टाटाकडून मोठं गिफ्ट! तीन महिन्यात ४५ हजार घरात सौर प्रकाश

IND vs ENG 3rd Test : मोहम्मद सिराजच्या 'या' कृतिचा अर्थ काय? जाणाल तर भावनिक व्हाल, Video Viral

महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार! असोसिएशनकडून राज्यव्यापी बंदची घोषणा, कधी आणि का?

SCROLL FOR NEXT