कोल्हापूर

मंडलिक अंक

CD

फोटो- 79843

सदाशिवराव मंडलिक यांच्या
कार्याची राधानगरीकरांना जाणीव

अरुण डोंगळे; कासारवाडा येथे महायुतीची बैठक

राधानगरी, ता. २५ : स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी कागल, भुदरगड, राधानगरी तालुक्यांच्या हरितक्रांतीसाठी मोठे योगदान दिले आहे. तोच वारसा घेऊन संजय मंडलिक कार्यरत आहेत. सिंचनासाठी केलेल्या मंडलिकांच्या कार्याची जाणीव ठेवून राधानगरी तालुका प्रा. मंडलिक यांना मताधिक्य देईल, असा विश्वास ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी व्यक्त केला.
महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कासारवाडा (ता. राधानगरी) येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विजय बलुगडे, भाजपचे संभाजी आरडे, मनसेचे राजेंद्र चव्हाण, बी. एस. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष विलास रणदिवे, सोलापूरचे माजी सरपंच कुंडलिक पाटील यांची भाषणे झाली.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष तथा ‘गोकुळ’चे संचालक प्रा. किसन चौगले, हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणीचे चेअरमन व बिद्रीचे संचालक उमेश भोईटे, राजाराम पाटोळे, माजी जि. प. सदस्य विनय पाटील, ‘भोगावती’चे माजी संचालक विश्वास पाटील, सरवडेचे माजी सरपंच राजाराम साठे, राहुल पाटील-चंद्रेकर, भाजपा मीडिया सेलचे प्रमुख महेश पाटील, श्रीकांत कुलकर्णी, शरद पाटील-मालवेकर, बळवंत बरगे, राजेश पाटील, महेंद्र पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे, विजय महाडिक, माजी उपसभापती अरुण जाधव, आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष गजानन कांबळे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शाकीर पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT