paid holiday on voting sakal
कोल्हापूर

Paid Holiday on Voting: मतदानासाठी ७ मे रोजी पगारी सुट्टी द्या अन्यथा कारवाई करणार ! सहायक कामगार आयुक्तांचे आवाहन

पूर्ण दिवस शक्य नसल्यास तीन तासांची सवलत देण्याचे आवाहन

CD

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. २६ : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी सर्व आस्थापना व कारखान्यांतील कामगारांना ७ मे रोजी सुटी जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी सर्व आस्थापना, कारखाने, दुकानदारांनी करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी केले आहे.

हातकणंगले मतदारसंघांत ७ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी एमआयडीसी, पॉवरलूम, प्रोसेसिंग, पेट्रोल पंप, मेडिकल, बांधकाम, हॉटेल, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने आदी क्षेत्रांतील कामगारांना पगारी सुटी जाहीर केली आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या कार्यकक्षेत शिरोळ व हातकणंगले या दोन तालुक्यांचा समावेश आहे. तसेच शहर व आसपासच्या परिसरात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी येथे कामगारांची संख्या लक्षणीय आहे.
आस्थापनांनी लोकसभा निवडणुकीदिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी द्यावी.

सुटी ही साप्ताहिक सुटी रद्द करून देऊ नये. याबाबत ज्या आस्थापना कर्मचाऱ्‍यांना सुटी अथवा सवलत देत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

पूर्ण दिवस शक्य नसल्यास तीन तासांची सवलत

अपवादात्मक परिस्थितीत कर्मचाऱ्‍यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल त्यांना दोन ते तीन तासांची सवलत द्यावी. त्याबाबत आस्थापनांना आयुक्त, महानगरपालिका अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकाने घेणे आवश्यक राहील, असे पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT