कोल्हापूर

किशोरवयीन मुला-मुलींसाठी अवनि संस्थेतर्फे शिबिर

CD

किशोरवयीन मुला-मुलींसाठी
अवनि संस्थेतर्फे शिबिर
कोल्हापूर : अवनि संस्थेअंतर्गत कचरावेचक महिलांच्या मुला-मुलींसाठी उन्हाळी सुटी दरम्यान वस्ती पातळीवर किशोरवयीन मुला-मुलींसाठी ‘चला, चौकटी बाहेरचे शिकू या,’ यावर शिबिर झाले. वस्ती पातळीवरील राजेंद्रनगर, विचारे मळा, मुडशिंगी, रेंदाळ, सलोखे पार्क येथील कचरावेचक महिलांच्या १३० मुला-मुलींनी यात सहभाग घेतला. किशोरवयीन मुला-मुलींत होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक बदलाविषयी मार्गदर्शन केले. मुलांचे अधिकार आणि कर्तव्य, मी इतरांपेक्षा वेगळा आहे, सौंदर्य, मैत्री, प्रेम, आकर्षण, वयात येताना होणारे बदल, व्यसन, करिअर मार्गदर्शन, बौध्दिक आणि मनोरंजनात्मक खेळ याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरास इम्रान शेख, शाहरुख आटपाडे, जयश्री कांबळे यांनी मार्गदर्शन केले. अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर झाले. वनिता कांबळे, मनीषा कांबळे, अलनिसा गनिभाई, लता धुमाळ, सारिका मागाडे, रेश्‍मा चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

SCROLL FOR NEXT