कोल्हापूर

पुण्यातील सुरक्षारक्षक निघाला गंठण चोरटा

CD

80811
...

पुण्यातील सुरक्षारक्षक निघाला गंठणचोर
गर्दीचा फायदा घेत करायचा चोऱ्या ः सीबीएसवरील गुन्हा उघडकीस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः मध्यवर्ती बसस्थानकावरून प्रवास करणाऱ्या पुणे येथील महिलेचे गंठण, मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील दागिने विकण्यासाठी एक संशयित सासने ग्राऊंड परिसरात येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. सोमनाथ अशोक आंब्रे (रा. पांगरे, ता. सिन्नर, नाशिक) असे संशयिताचे नाव असून, तो पुण्यामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
पुण्याहून मध्यवर्ती बसस्थानकावर आलेल्या पूनम कांबळे यांच्या पर्समधील दोन तोळ्यांचे गंठण, मोबाईल व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. याचा तपास करण्यासाठी पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी डी. बी. पथकाला सूचना केल्या होत्या. दरम्यान, संशयित चोरटा गंठण विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सासने ग्राऊंड परिसरात सापळा रचला होता. याठिकाणी पोलिसांनी संशयित सोमनाथ आंब्रेला पकडून अंगझडती घेतली असता गंठण, मोबाईल मिळून आले. याविषयी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्याने सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकावर केलेल्या चोरीची कबुली दिली. गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार संदीप जाधव, धर्मेंद्र बगाडे, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखन पाटील, संदीप बंद्रे यांनी केला.
...
सुरक्षारक्षकाचे ओळखपत्र
सोमनाथ आंब्रे खाकी कपडे घालून वावरत असल्याने बसस्थानकावर त्याचा कोणाला संशय येत नव्हता. बसचा वाहक किंवा चालक दिसण्याचा त्याचा खटाटोप होता. तसेच त्याच्या खिशात पुण्यातील एका सुरक्षारक्षक कंपनीचे ओळखपत्र मिळून आले आहे. तो पुण्यातील या कंपनीकडे केव्हा काम करत होता, याचीही चौकशी पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT