कोल्हापूर

उद्धव ठाकरें कोल्हापुरात मुक्कामी

CD

फोटो 81157

उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा
संजय पवारांच्या घरी भेट; करवीर निवासिनी अंबाबाईचे घेतले दर्शन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : कोल्हापुरात मुक्कामी असलेल्या माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी हॉटेल सयाजीमध्ये थांबून दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेतला. कोठेही कमी पडता कामा नये, त्यासाठी आवश्‍यक कानमंत्रीही काही प्रमुख आणि त्यांच्या बॅक ऑफिसच्या प्रमुखांनाही दिल्याचे समजते. त्यानंतर दुपारी जिल्हाप्रमुख आणि उपगटनेते संजय पवार यांच्या घरी भेट दिली. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेऊन ते सांगलीला जाहीर सभेसाठी रवाना झाले.
महाविकास आघाडीच्या जाहीर प्रचार सभेसाठी काल उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल झाले. इचलकरंजीतील सभेनंतर त्यांनी रात्री गांधी मैदानातील सभा गाजवली. त्यानंतर ते कोल्हापुरातच मुक्कामी राहिले. यानंतर आज दुपारी तीनपर्यंत त्यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेतला. दोन्ही मतदारसंघांतील काही प्रमुख आणि बॅक ऑफिसच्या प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली. सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार नेमके कोणत्या टप्प्यावर आहेत? प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील स्थिती काय आहे? कोठे कमी पडत आहोत? याची माहिती त्यांनी ग्राऊंड रिपोर्टद्वारे घेतल्याचे सांगण्यात आले.
काही प्रमुखांना त्यांनी सूचनाही केल्या आहेत. त्यानंतर दुपारी ते सांगलीला प्रचारासाठी जाण्यास निघाले. यावेळी संजय पवार यांच्या कन्येच्या लग्नाला ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची भेट त्यांनी आज दुपारी घेतली. तेथे शाल-श्रीफळ देऊन पवार कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. तेथून पुढे त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले. तेथे माध्यम प्रतिनीधींनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंबाबाईचे दर्शन घेतले. आता काही नको, असे म्हणून त्यांनी माध्यमांसमोरे बोलणे टाळले. यानंतर ते सांगलीला रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT