कोल्हापूर

‘कोल्हापूर’ची ‘सातारा’ वर १४६ धावांनी मात

CD

82806
सेजल सुतार
........
82807
मुस्कान खतवाणी
.............
‘कोल्हापूर’ची ‘साताऱ्या’वर १४६ धावांनी मात

एमसीए निमंत्रित १९ वर्षांखालील महिला क्रिकेट स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निमंत्रित १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मुस्कान खतवाणी, आदिती पाटोळे यांच्या अर्धशतकी आणि सेजल सुतारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघाने सातारा संघाचा १४६ धावांनी पराभव केला.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर आज कोल्हापूर व सातारा जिल्हा संघांत सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर जिल्हा संघाने ५० षटकांत ९ बाद २७७ धावा केल्या. यात मुस्कान खतवाणीने ६३ चेंडूंत ६३ धावा केल्या, तर आदिती पाटोळेने ६० चेंडूंत ५३ धावा केल्या. रसिका शिंदेने ३५, अनन्या चव्हाणने १८, मधुरा इंगवलेने १४ धावा केल्या. सातारा संघाकडून मनस्वी जाधवने तीन, वैदेही जोशी, निशिगंधा नलवडे, भूमी फाळके, श्रावणी शेंडगे, श्‍वेता माने यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
उत्तरादाखल खेळताना सातारा संघाला हे आव्हान पेलवले नाही. कोल्हापूरच्या सेजल सुतारने भेदक गोलंदाजी करत चार, तर अनन्या चव्हाणने दोन, ईश्‍वरी राणे, परिणिता पाटील, रसिका शिंदे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यांचा सर्व संघ २६ षटके ३ चेंडूंत १३१ धावांत गुंडाळला. यात मनस्वी जाधवची ५२ धावांची खेळी व्यर्थ ठरली. राही कुलकर्णीने २३, तर श्रेया कुंभारने १७ धावा केल्या. त्यामुळे या सामन्यात सातारा संघाचा १४६ धावांनी पराभव झाला.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT